बायोमेट्रिक हजेरी नियमित तपासणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

नाशिक - महापालिकेच्या कामकाजाला शिस्त लावण्याचा भाग म्हणून पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी आता कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी नियमित तपासण्याचे आदेश विभागप्रमुखांना दिले आहेत. त्याचबरोबर शिक्षक, डॉक्‍टर, सफाई कर्मचारी तसेच फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ‘आधार’कार्डावर आधारित हजेरी नोंद घेणार आहेत. 

महापालिकेच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी आयुक्त कृष्णा यांनी गेल्या आठवड्यापासून विविध उपाययोजना लागू केल्या आहेत. आयुक्तांनी घेतलेल्या कडक पवित्र्यामागे अधिकारीवर्गाने थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्याचा हा परिणाम मानला जात आहे. गेल्या आठवड्यात दोन निवृत्त व अग्निशमन दल प्रमुखांची विभागीय चौकशी प्रस्तावित केली. त्यानंतर कर्मचारी कार्यालयीन वेळेत हजर राहत नसल्याचे लक्षात आल्याने त्याबाबत आदेश काढले. गेल्या वर्षी बदली झालेल्या काही कर्मचाऱ्यांचे खातेप्रमुखांतर्फे बदलीचे प्रस्ताव सादर होत असल्याने त्यालाही आयुक्तांकडून प्रतिबंध घालण्यात आला. आता आयुक्तांनी थेट हजेरीवर लक्ष केंद्रित केले आहे.

पालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांत बायोमेट्रिक यंत्रे लावली आहेत. त्यामुळे परस्पर हजेरी लावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अशा प्रकारच्या वृत्तीला चाप बसला आहे. बायोमेट्रिक हजेरीची नियमित तपासणी होत नसल्याचेही लक्षात आल्याने आता खातेप्रमुखांना नियमित हजेरी तपासण्याचे आदेश देण्यात आले. महापालिकेचे सफाई कर्मचारी, डॉक्‍टर, शिक्षक, प्लंबर, इंजिनिअर या फिल्डवर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी आधारकार्ड नोंदणीद्वारे हजेरी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या माध्यमातून कर्मचारी कामावर आहे की नाही, याची माहिती होईल.

Web Title: nashik news regular cheaking biometric presenty