निवृत्त लष्करी जवानाची गोळी झाडून आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

नाशिक - वडनेर येथे राहणाऱ्या निवृत्त लष्करी जवानाने राहत्या घरी रायफलने गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता.5) रात्री 8 ते 9 च्या सुमारास घडली. 

संतोषकुमार महेश्वर चौधरी (वय 42) हे वडनेर येथे राहत होते. 2012 मध्ये ते लष्करी सेवेतून निवृत्त झाले होते. त्यांनी स्वतःवर राहत्या घरात 12-बोअर रायफलद्वारे गोळी झाडून घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून मृत्यूस कोणीही जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, कुटुंबीय लग्नानिमित बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. 

Web Title: nashik news retired army suicide