तांदळाला हवी जागतिक बाजारपेठ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

घोटी - तांदळाचे पठार व सुवर्णमध्य असलेल्या तांदूळ व भगर मिल व्यावसायिकांनी अन्न व प्रशासन विभागाला सहकार्य करून उत्पादनवाढीसाठी कायद्याची अंमलबजावणी करावी. आपला व्यवसाय जिल्हापुरता मर्यादित न ठेवता जगभरातील आर्थिक राजधानीत पोचण्यासाठी तयारीला लागावे. तांदळातील जीवनसत्त्व कमी न करता रसायनमुक्त असण्यावर भर देत जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त उदय वंजारी यांनी येथे केले.  

जैन भवन सभागृहात राइस मिल उत्पादक असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘अधिकारी आपल्या दारी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर अन्नसुरक्षा अधिकारी सागर तरेकर, विवेक पाटील, गुलाबसिंग वसावे, इगतपुरी तालुका मिल असोसिएशनचे अध्यक्ष नवसू पिचा, उपाध्यक्ष सुरेश काळे, भाजप उद्योग आघाडीप्रमुख गोठूशेठ कुमट उपस्थित होते.

श्री. वंजारी म्हणाले, की शासनाच्या वतीने ‘अधिकारी आपल्या दारी’ येत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग आपणास व्यवसायात आवश्‍यक ते सहकार्य करेल. नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल, असाही इशारा त्यांनी दिला. 

तांदळातील भेसळ, स्वच्छता, साठवणूक प्रक्रिया, प्रदूषण, मालवाहतूक परवाना आदींवर सागर तरेकर, विवेक पाटील यांनी मार्गदर्शन करत उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. या वेळी संजय चोरडिया, राजू भंडारी, ललित पिचा, सुरेश चोरडिया, प्रकाश भंडारी, विजय चांडक, नितीन चोरडिया, मनोज कोचर यांच्यासह भगूर येथील मिल असोसिएशनचे पदाधिकारी व मिल व्यावसायिक उपस्थित होते.

Web Title: nashik news rice Global market