रस्ता ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांना हक्काची वेळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

दहा सेकंदाच्या अलार्मवेळी चहूबाजूंनी ‘रेड सिग्नल’

नाशिक - चौकांमधील सिग्नल ओलांडताना फक्त वाहनधारकांचाच हक्क असतो असे नाही तर पादचाऱ्यांसाठीदेखील चौक ओलांडण्यासाठी सिग्नल आहे; परंतु आतापर्यंत ही बाब दुर्लक्षित करण्यात आली होती. आता यापुढे तसे होणार नाही. महापालिकेने सिग्नल यंत्रणांवर अलार्म सिस्टिम कार्यान्वित केली असून, ठराविक वेळेत अलार्म वाजल्यानंतर चहूबाजूची वाहतूक थांबणार असून, पांढऱ्या पट्ट्यांवरून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे शक्‍य होणार आहे.

वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे सिग्नलवर होणारी कोंडी मोडण्यासाठी सिग्नलचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र आता ही प्रणाली महापालिकेतर्फे सिग्नलवर रस्ता ओलंडणाऱ्या पादचाऱ्यांसाठी करण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे पादचाऱ्यांसाठी सिग्नलवर स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आली. महापालिकेतर्फे शहरातील सर्व चौकांत असलेल्या सिग्नलवर कार्यान्वित करण्यात येईल.

नाशिक महापालिका क्षेत्रातील विविध चौकांत महापालिकेतर्फे स्वयंचलित वाहतूक नियंत्रक (सिग्नल) बसविलेले आहेत. मात्र सिग्नलवर रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. वाहतूक नियमांची पायमल्ली वाहनांकडून सतत केली जात असल्याने झेब्रा पट्ट्याच्या पुढे वाहने येत असल्याने पायी रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरावा लागतो. मात्र, पादचाऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन महापालिकेने प्रत्येक चौकामध्ये रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांसाठी सिग्नल यंत्रणेमध्ये स्वतंत्र वेळ दिला आहे. 

प्रत्येक चौकात ‘हुटर’   
चौकातील वाहनांसाठी असणारे चारही बाजूचे सिग्नल काही सेकंदांसाठी लाल रंगाचे दर्शविणारे असतील. त्या वेळी सर्व सिग्नलवर असलेल्या चौकामध्ये दहा सेकंदासाठी हुटर (ऑडिओ अलार्म) वाजून पादचाऱ्यांना रस्ता ओलंडण्याकरिता चारी बाजूंची वाहने थांबतील. सर्व वाहनचालकांनी या अलार्मची नोंद घेत जेव्हा लाल दिवा असेल तसेच हुटर वाजत असेल अशा वेळी रस्ता ओलांडू नये आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना रस्ता किंवा चौक ओलांडण्यासाठी मोकळा करून देण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title: nashik news The right time for the pedestrians to cross the road