रस्ता सुरक्षा अभियान मार्च-एप्रिलमध्ये?

नरेश हाळणोर
सोमवार, 15 जानेवारी 2018

नाशिक - रस्ता वाहतूक सुरक्षिततेसंदर्भातील "रस्ता सुरक्षा अभियान' राज्यासह देशभरात जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये राबविले जात असले तरी यंदा ते गुंडाळले जाण्याचीच अधिक शक्‍यता आहे. उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये याच महिन्यात कमालीची थंडी अन्‌ दाट धुक्‍याची समस्या हे अभियान गुंडाळले जाण्यास कारणीभूत मानले जाते.

उत्तर भारतातील राज्यांनी केंद्राच्या रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे आर्जव केल्यामुळे अद्यापही अभियानासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे अभियान मार्च-एप्रिल महिन्यामध्ये होण्याची शक्‍यता असली, तरी याचकाळात बहुतांश राज्यांमध्ये शालेय परीक्षा असल्याने अभियानच गुंडाळले जाण्याची अधिक शक्‍यता आहे. जानेवारी महिन्याचा दुसरा पंधरवडा तोंडावर आला असतानाही केंद्राच्या रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून रस्ता सुरक्षा अभियानासंदर्भातील अधिसूचनाच जाहीर झाली नाही. शेवटी पोलिस महासंचालक कार्यालयाच्या वाहतूक अधीक्षकांनी केंद्राच्या रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानुसार सोयीप्रमाणे वाहतूक सप्ताह राबविण्याचे पत्र राज्यातील पोलिस मुख्यालयांना दिले.

उत्तर भारतातील धुक्‍यामुळे निर्णय
उत्तर भारतामध्ये जानेवारी महिन्यात दाट धुक्‍यामुळे वाहतुकीसंदर्भातील उपक्रम राबविण्यास समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे उत्तर भारतातील राज्यांनी केंद्राकडे रस्ता सुरक्षा अभियान जानेवारीनंतर राबविण्यासाठीची आर्जव केली आहे. त्यामुळे यंदा संबंधित मंत्रालयानेही जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात राबविले जाणाऱ्या अभियानासंदर्भात कोणतीही अधिसूचना जाहीर केली नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.

Web Title: nashik news road security campaign in march april