कल्याण- ठाणे मार्ग विस्तारीकरणाने नाशिक- मुंबई प्रवास होणार सुखकर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

नाशिक -  केंद्रीय रस्ते व वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांनी कल्याण ते ठाणेदरम्यान वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तो मार्ग आठपदरी करण्याची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात आठपदरी महामार्ग अस्तित्वात आल्यास नाशिकच्या विकासाला यानिमित्ताने मोठे योगदान मिळणार आहे. प्रवासी वाहतुकीबरोबरच शेतीमाल जागतिक बाजारपेठेत पोचण्याचा कालावधी कमी होणार आहे. 

नाशिक -  केंद्रीय रस्ते व वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांनी कल्याण ते ठाणेदरम्यान वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तो मार्ग आठपदरी करण्याची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात आठपदरी महामार्ग अस्तित्वात आल्यास नाशिकच्या विकासाला यानिमित्ताने मोठे योगदान मिळणार आहे. प्रवासी वाहतुकीबरोबरच शेतीमाल जागतिक बाजारपेठेत पोचण्याचा कालावधी कमी होणार आहे. 

नाशिक ते मुंबई 185, नाशिक ते ठाणे 165, तर नाशिक ते कल्याण फाटा 135 किलोमीटरचे अंतर आहे. नाशिक ते मुंबई महामार्गाचे विस्तारीकरण झाल्यानंतर नाशिकच्या वाहतुकीला गती मिळाली आहे. परंतु, ही गती कल्याण फाट्यापर्यंतच मिळते. कल्याणपासून पुढे ठाणे व मुंबईपर्यंत जाण्यासाठी वाहतुकीमुळे ब्रेक लागतो. सध्या कल्याण फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यातूनसुद्धा या भागातील वाहतुकीचा प्रश्‍न सुटणार आहे. कल्याण फाटा ते मुंब्रा टोल नाक्‍यापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होते. एकदा वाहतूक ठप्प झाल्यास दीड ते दोन तास वाहने बाहेर पडत नाहीत. पावसाळ्यात तर बिकट परिस्थिती निर्माण होते. परंतु, केंद्रीय वाहतूकमंत्री गडकरी यांनी नुकतीच ट्‌विटरवरून महामार्ग विस्तारीकरणाची घोषणा केली आहे. ज्यावेळी महामार्ग अस्तित्वात येईल, त्यावेळी कल्याण, ठाणे, मुंबईसह नाशिकच्या वाहतुकीला कमालीची गती मिळणार आहे. मुंबई व नवी मुंबईसाठी नाशिकला भाजी मंडई म्हटले जाते. नाशिकहून रोज दीड ते दोन हजार ट्रक भाजीपाला पोचतो. सध्या थेट मुंबईत पोचण्यासाठी चार तास लागतात. कल्याण, डोंबिवली, ठाणे, भायखळा, कुर्ला येथपर्यंत भाजीपाला पोचण्यासाठी विलंब होतो. कल्याण फाटा येथे ठप्प होणारी वाहतूक त्यास कारणीभूत ठरते. परंतु, आठपदरी महामार्ग झाल्यास मुंबईत वाहने वेगाने पोचतील. 

"समृद्धी' अन्‌ आठपदरी मार्ग 
नाशिकचा भाजीपाला व फळांना देशभरात मागणी आहे. मुंबई महत्त्वाची बाजारपेठ असली तरी तेथे माल पोचण्यास वेळ लागतो. एका बाजूने समृद्ध महामार्ग तयार होत असल्याने मुंबईसह नागपूर व उत्तर भारतात पोचणे सोपे होणार आहे. आता कल्याणपासून ठाण्यापर्यंत आठपदरी महामार्गाचे नियोजन असल्याने कल्याण, ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर, घोडाबंदर या भागातही नाशिकचा भाजीपाला वेगाने पोचेल. 

Web Title: nashik news road vegetable