ग्रामीण आरोग्य बॅंकेचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

नाशिक - ग्रामीण भागात विविध आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे ग्रामीण आरोग्य बॅंक विभागाची स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विद्यापीठ मुख्यालयात विस्तार करणे अन्‌ आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी विद्याशाखांच्या स्वतःच्या महाविद्यालय बांधकामाचा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आला आहे. संशोधनाला प्राधान्य देणाऱ्या विद्यापीठाच्या अंदाजपत्रकात त्यासाठी 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

विद्यापीठाची पदवी संपादन केलेल्या माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. विद्यापीठाच्या अधिसभेत काल डॉ. यशवंत पाटील यांनी अर्थसंकल्प सादर केला.

Web Title: nashik news rural health bank proposal