'कृषी ग्राम समित्यांच्या "नाशिक पॅटर्न' राज्यभर'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

नाशिक - ""शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा कृषी ग्राम समित्यांचा "नाशिक पॅटर्न' राज्यभर राबविण्यात येईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कृषी ग्राम समिती राबविण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अनुकूलता दर्शविली आहे,'' असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी येथे सांगितले. तसेच शेतीच्या बांधापेक्षा बंधारा आवडण्याच्या मानसिकेतून कृषी विभागाच्या कर्मचारी अन्‌ अधिकाऱ्यांनी बाहेर पडून शेतकऱ्यांच्या बांधावर उभे राहावे, अशा शद्बांमध्ये खोत यांनी यंत्रणेला फटकारले. 

यवतमाळमध्ये रासायनिक औषधे फवारणीतून उद्‌भविलेल्या प्रश्‍नांची पुनरावृत्ती राज्यात इतरत्र होऊ नये म्हणून खोत यांनी शेतकऱ्यांचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांना नेमकी कोणती बियाणे, खते, कीटकनाशके हवेत यासाठी कृषीच्या यंत्रणेने शेतकऱ्यांशी संवाद वाढवावा यासाठी नाशिकपासून आढावा बैठकीला सुरवात केली आहे. ते म्हणाले, की परवाने द्यायचा आणि परवाना नूतनीकरण करायचे एवढ्यापुरते अधिकाऱ्यांनी मर्यादित राहू नये. शंभर टक्के दुकानांची तपासणी केली जावी. त्यासाठी राज्य आणि पंचायत समित्याच्या कृषी अधिकाऱ्यांचे पथक स्थापन करावे. मंडल कृषी अधिकाऱ्यांचा समावेश करून शेतकऱ्यांशी संवाद साधणारे मेळावे घ्यावेत. 

धाडी टाका अन्‌ दोषींवर करा कारवाई 
पथकाद्वारे छापा घाला, परवाना दिलेल्या व्यतिरिक्त आढळणाऱ्या कृषी निविष्ठांच्या विरोधात कारवाई करावी. तसेच संबंधित भागातील अधिकाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करावी, असा आदेश खोत यांनी दिला. ते म्हणाले, की केवळ वर्णन केलेल्या डायरी आढळल्यास प्रवासभत्ता देऊ नये. त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये ठिबक सिंचन संच बसवलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अनुदान मिळायला हवे. शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर शेतकऱ्यांसमवेत जाऊन पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदवाव्यात.

Web Title: nashik news sadhabhau khot