सह्याद्री सायकलिस्टने अमेरिकेत फडकविला तिरंगा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

भारतीय वेळेनुसार आज पावणे बाराच्या सुमारास टीमने स्पर्धा पूर्ण केली. डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. रमाकांत पाटील, डॉ. संदीप शेवाळे, पंकज मारलेशा या चौघा सायकलिस्टने मिळून तीन हजार मैलहून अधिक अंतर पूर्ण केले आहे.

नाशिक - रेस अक्रोस अमेरिका स्पर्धा जिंकत सह्याद्री सायकलिस्ट संघाने पुन्हा एकदा अमेरिकेत तिरंगा फडकविला आहे.

भारतीय वेळेनुसार आज पावणे बाराच्या सुमारास टीमने स्पर्धा पूर्ण केली. डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. रमाकांत पाटील, डॉ. संदीप शेवाळे, पंकज मारलेशा या चौघा सायकलिस्टने मिळून तीन हजार मैलहून अधिक अंतर पूर्ण केले आहे.

सहयाद्री सायकलिस्टच्या संघात डॉ. सुनील वर्तक, डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. चंद्रकांत संकलेचा, डॉ. महेंद्र महाजन, डॉ. बापू घोडके, डॉ.आशुतोष ठोळे, मोहिंदर सिंग हे नाशिकचे सदस्य तर पुणे येथील डॉ. परीक्षित गोगाटे, अमेरिकेचे राहुल गुप्ते, अमोल पटवर्धन, पुष्कराज फाटक, इंग्लंड येथील मधू जोशी, सचिन जपे, मुंबईचे दीप उदेशी, नीलेश सातभाई, कॅनडाचे गजानन सहस्त्रबुद्धे यांचा समावेश होता.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
ट्रम्प यांनी मोडली व्हाईट हाऊसमधील "इफ्तार' परंपरा...
शेतकरी व शिवसेना एकत्र आल्यामुळे कर्जमुक्ती- उद्धव ठाकरे​
नितीशकुमारांचे अपने रंग हजार ....​
काळाकुट्ट २५ जून अन्‌ बिनचेहऱ्याचा प्रकाश!​
फेसबुकवरही "विराट'चे विराटप्रेमी​
भारताचा विंडीजवर 105 धावांनी विजय​
सरकारचे तोंड शेतकऱ्यांकडे वळविले - खोत​

Web Title: Nashik News Sahyadri cyclist complete race in USA