‘सकाळ- कलांगण’ रविवारी बहरणार नारोशंकराच्या प्रांगणात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक असलेली भलीमोठी घंटा; कोरीव अक्षय नाग अन्‌ स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना

नाशिक - देशभर आता कांदा, द्राक्षाचे शहर म्हणूनही नाशिक परिचित होऊ लागले आहे. शहरात एवढा बदल झपाट्याने होत असला, तरी सांस्कृतिक ठेवा, पौराणिक, धार्मिकता नाशिककरांनी जपलेली दिसते. अशाच वेगळ्या बंधनातून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी बहरणाऱ्या ‘सकाळ- कलांगण’ची वाटचाल सुरू आहे. येत्या रविवारी (ता. ३०) नारोशंकराच्या प्रांगणात ‘सकाळ- कलांगण’ सकाळी आठला बहरणार आहे. कलाप्रेमी नाशिककरांना आपली कला सादरीकरणाची संधी मिळणार आहे.

‘सकाळ- कलांगण’चा हा सोळावा उपक्रम आहे. या कार्यक्रमात शहरातल्या ज्येष्ठ कलाकारांसह मंदिराचे विश्‍वस्त सदाशिवराव राजेबहादूर, चंद्रकांतराव राजेबहादूर, निशिकांतराव राजेबहादूर हेही सहभागी होणार आहेत. चित्र, शिल्प, नाट्य, संगीत, काव्य, कथाकथन, नकला, गायन, वादन, अशा विविध कलांसाठी मुक्त व्यासपीठ ठरलेला हा उपक्रम आगळावेगळा ठरत आहे. गंगाघाटावरील नारोशंकर मंदिर हे असेच ऐतिहासिक व धार्मिक स्थान असून, स्थापत्यशैलीचा अनोखा नमुना आहे. सरदार नारोशंकर राजेबहादूर यांनी या मंदिराची निर्मिती केली. त्यामुळे हे मंदिर ‘नारोशंकर मंदिर’ नावानेच ओळखले जाते. श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजीआप्पा वसईच्या किल्ल्यात बंदिस्त होते. त्यांची सुटका करण्यासाठी लढाई झाली.

त्या वेळी झालेल्या लढाईत मराठ्यांनी शौर्य गाजविले. मराठ्यांचे शौर्य अभूतपूर्व होते. सरदार राजेबहादूर यांनी वसईहून भलीमोठी घंटा बरोबर आणली. ती नारोशंकर मंदिराच्या प्रवेशद्वारावर ठेवली. ही घंटा आजही मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून डोलत आहे.

या मंदिराची आणखी काही वैशिष्ट्ये सांगता येतील. मंदिराचा सभामंडप हेमाडपंती, तर चारही कोपऱ्यांवरील छत्र्या राजपूत शैलीच्या आहेत. या मंदिराचे शिखर लक्षवेधी आहे. आत अक्षय नागाच्या मूर्ती कोरलेल्या 

आहेत. या दगडी कोरीवकामावर राजस्थान व गुजरातच्या कलाकारांच्या कामाची शैली जाणवते. ‘सकाळ- कलांगण’ उपक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. 

सादरीकरणासाठी उत्तम व्यासपीठ
आपल्या मनातील चित्र, शिल्प, गाणे, नृत्य सादर करण्याची ही संधी ‘सकाळ- कलांगण’ने उपलब्ध करून दिलेली आहे. कलानिकेतनच्या चित्रकला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिनकर जानमाळी, के. के. वाघ ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन वाघ, अधिष्ठाता बाळ नगरकर, रचना चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य राजू दाणी, कोणार्कनगरच्या अनमोल चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत गोराणकर, दादाजी आहेर चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य रामभाऊ डोंगरे सहभागी होतात. कलाशिक्षकांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होत असतात. ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार, भि. रा. सावंत, व्यंग्यचित्रकार ज्ञानेश बेलेकर, चित्रकार राजेश सावंत, प्रफुल्ल सावंत प्रा. दीपक वर्मा, अतुल भालेराव आदी दिग्गज कलाकारांच्या कलाकृती पाहण्याची संधी ‘सकाळ- कलांगण’मुळे मिळते.

Web Title: nashik news sakal-kalarang event