सप्तश्रृंगी गडावरील फनिक्युलर ट्रॉली लाल फितीत

दिगंबर पाटोळे
रविवार, 25 मार्च 2018

आद्य शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक राज्यभरातून येत असतात. याठिकाणी चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव असे वर्षातून दोन वेळेस मोठी यात्रा भरते. स्वयंभू  असलेल्या आदिमायेचे मंदीरात दर्शनासाठी जाण्यासाठी ५५१ पायऱ्यांचा वापर करावा लागतो. त्यामुळे अपंग, वृद्ध, लहान बालकांना दर्शन घेणे मोठे जिकिरीचे ठरते. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असलेले छगन भुजबळ यांनी फ्यूनिक्युलर ट्रॉली बनविण्याचे कंत्राट सुयोग बक्षानी फ्यूनिक्युलर ट्रॉली प्रा. लि. या कंपनीस दिले होते.

वणी : देशातील पहिल्या फ्युनिक्यलर ट्रॉली प्रकल्पाचा लोकार्पन सोहळा 'लाल फितीत' अडकल्याने आज पासून सुरु झालेल्या आदिमायेच्या चैत्रोत्सवात 'फ्युनिक्युलर ट्रॉली' द्वारे आदिमायेचे सहजतेने दर्शन मिळण्याची आस लावून राहिलेल्या हजारो वृध्द, अपंग भाविकांना पुन्हा एकदा प्रतिक्षा करावी लागणार आहे.

आद्य शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक राज्यभरातून येत असतात. याठिकाणी चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव असे वर्षातून दोन वेळेस मोठी यात्रा भरते. स्वयंभू  असलेल्या आदिमायेचे मंदीरात दर्शनासाठी जाण्यासाठी ५५१ पायऱ्यांचा वापर करावा लागतो. त्यामुळे अपंग, वृद्ध, लहान बालकांना दर्शन घेणे मोठे जिकिरीचे ठरते. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असलेले छगन भुजबळ यांनी फ्यूनिक्युलर ट्रॉली बनविण्याचे कंत्राट सुयोग बक्षानी फ्यूनिक्युलर ट्रॉली प्रा. लि. या कंपनीस दिले होते.

१५ अॉगस्ट २००९ साली प्रकल्पाचे भुमीपूजन छगन भुजबळ यांच्या हस्ते होवून सुरु झालेले काम अनेक अडीअडचणींवर मात करत नऊ वर्षांच्या कालावधीनंतर एकदाचे पुर्ण झाले, आणि भाविकांची फनिक्युलर ट्रॉलीची प्रतिक्षा संपली. ट्रॉलीचा लोकार्पन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होण्यासाठी कंपनीच्यावतीने प्रयत्नांना मुख्यमंत्री कार्यालयाने सकारात्मक प्रतिसाद देत सुरुवातीला ४ मार्च ही लोकार्पण सोहळ्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यादृष्टीने २७ फेब्रुवारी रोजी खासदार हरीश्चंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, पोलिस अधिक्षक संजय दराडे, राज्य आपत्ती व्यवस्थापन तसेच यशदाचे पथकाने प्रकल्पाचे पाहाणी व अंतिम चाचणी घेतली. यावेळी पथकास काही त्रृटी आढळल्याने ४ मार्चचा लोकार्पन सोहळा पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर कंपनी, ट्रस्ट व सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक त्रुटींची पूर्तता व आवश्यक परवांग्याचे सोपस्कार पार पाडल्यानंतर मुख्यमंत्र्याच्या सचिवालयातून जिल्हाधिकारी कार्यालयास आलेल्या संदेशानूसार मुख्यमंत्र्याचा १७ मार्च रोजीचा संभाव्य नाशिक दौराचा कार्यक्रम निश्चित होवून पुन्हा एकदा १७ मार्च रोजी फनिक्युलर ट्रॉलीच्या लोकार्पन सोहळ्याची जय्यत तयारी प्रशासन व कंपनीने सुरु केली होती. त्यासाठी नांदुरी येथे हेलिपॅड, नांदुरी - सप्तश्रृंगी रस्त्याची डागदुडी, संरक्षक भितींना चुना लावण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेत १५ मार्च रोजी दौऱ्या संदर्भात सहाय्यक जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या उपस्थित कळवण येते आढावा बैठकही संपन्न झाली होती. मात्र १६ मार्च रोजी पुन्हा मुख्यमंत्र्याचा प्रस्तावित दौरा रद्द झाला.

पुन्हा एकदा ता. १७ रोजीचा ट्रॉलीचा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला. १७ मार्च रोजी सप्तश्रृंगी गडावर चैत्रोत्सवाच्या झालेल्या आढावा बैठकीत सुयोग बक्षानी फ्यूनिक्युलर ट्रॉली प्रा. लि. कंपनीच्या प्रतिनिधीने रद्द झालेला लोकार्पण सोहळा २२ मार्च रोजी होणार असल्याचे सांगितले. यावेळी चैत्रोत्सवापूर्वी तरी फनिक्युलर ट्रॉलीची सेवा भाविकांना मिळेल अशी अपेक्षा असतांना २२ मार्चही निघुन गेल्याने चैत्रोत्सवात आदिमायेच्या चरणी नतमस्तक होण्याची इच्छा बाळगुन असलेल्या वृध्द, अंपग, लहान मुले तसेच जलद गतीने दर्शन होण्याची इच्छा असणाऱ्या भाविकांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. दरम्यान आज पासून सुरु झालेल्या चैत्रोत्सवामुळे सुरक्षीतेच्या दृष्टीने  फनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पन सोहळा शक्य नसल्याने आदिमायेच्या भाविक भक्तांना फनिक्युलर ट्रॉलीची सेवा मिळण्यासाठी आता चैत्रौत्सवानंतरच वाट बघावी लागणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

Web Title: Nashik news Saptashrungi gad trolly