बोस यांच्याप्रमाणे देशसेवेसाठी झोकून द्या: माया त्रिभुवन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

बागलाण अॅकेडमीत नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
सटाणा (नाशिक): इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना करणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांचे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान महत्वपूर्ण आहे. आजच्या युवा पिढीने त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन देशसेवेसाठी स्वतःला झोकून द्यावे असे आवाहन मुख्याध्यापिका माया त्रिभुवन यांनी आज (मंगळवार) येथे केले.

येथील बागलाण अॅकेडमी पोलिस, सैनिक, सुरक्षारक्षक प्रशिक्षण केंद्रात आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२१ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख व्याख्याता म्हणून सौ.त्रिभुवन बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख आनंदा महाले तर प्रमुख पाहुणे म्हणुन शिवसेना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख डॉ.प्रशांत सोनवणे, सुभाष नंदन, शरद शेवाळे, हेमंत गायकवाड, मेजर रविंद्र अहिरे आदि उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अॅकेडमीच्या आवारातील सुभाषचंद्र बोस यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी संचलन करून मानवंदना दिली. कार्यक्रमास संस्थेच्या उपाध्यक्षा संगिता महाले, सचिव प्रशांत महाले, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हाप्रमुख सिताराम जाधव, केशवराव देवरे, उत्तम भामरे, अमोल पवार, भाऊसाहेब नांद्रे, अशोक नंदन, एस.आर.नेरे, आर.डी.ठाकरे, एस.के.खैरणार, एस.व्ही.शिर्के, सी.आर.हिरे, श्रीमती व्ही.डी.ठाकरे, एस.एस.पवार, ज्ञानेश्वर मगरे, एस.व्ही.बागुल, एस.एम.मोरे, व्ही.के.खैरनार आदींसह प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व के.बी.एच. विदयालयाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रशांत महाले यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Web Title: nashik news satana subhash chandra bose jayanti and maya tribhuwan