शंभरहून अधिक मद्यपींवर त्र्यंबक रस्त्यावर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

सातपूर - दोन दिवसांपासून त्र्यंबक, इगतपुरी, घोटी परिसरात कोसळणाऱ्या पावसाचा आनंद घेण्यासाठी आज हजारो महाविद्यालयीन तरुण-तरुणी पर्यटनासाठी परिसरात गेले होते. तेथे दिवसभर मद्य पार्टी करून सायंकाळी परतणाऱ्या जवळपास शंभरपेक्षा अधिक तरुणांवर सातपूर पोलिसांनी कारवाई केली. सातपूरच्या सुला वाइन चौकात सातपूरचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते व वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांची मशिनद्वारे तपासणी करण्यात आली. त्यामुळे काही काळ त्र्यंबक रस्त्यावर वाहतूक खोळंबल्याने कुटुंब असलेल्या गाड्या त्वरित सोडून देत दुचाकी व इतर गाड्या अडवून तपासणी करण्यात आली.

Web Title: nashik news satpur Action on drinker