शाळांना पुन्हा धान्यपुरवठा सुरू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

नाशिक - धान्यपुरवठा करण्याचा करार संपल्यामुळे आणि निविदाप्रक्रिया, ई-टेंडरमुळे जिल्हा परिषदांच्या शाळांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत बंद झालेला धान्याचा पुरवठा शासनाकडून सर्व जिल्हा परिषद शाळांना पुन्हा सुरू करण्यात आला. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांना तांदळाबरोबर तूर, मूग अशा इतर धान्यांचा पुरवठा करण्यात येतो. पुरवठा करार संपल्याने ऑगस्ट 2017 पासून जिल्ह्यातील शाळांना ठेकेदारांकडून पुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक यांनी त्यांच्या स्तरावर धान्याची खरेदी करण्याच्या सूचना देऊन पुरवठा शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आला होता.

नाशिक - धान्यपुरवठा करण्याचा करार संपल्यामुळे आणि निविदाप्रक्रिया, ई-टेंडरमुळे जिल्हा परिषदांच्या शाळांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत बंद झालेला धान्याचा पुरवठा शासनाकडून सर्व जिल्हा परिषद शाळांना पुन्हा सुरू करण्यात आला. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांना तांदळाबरोबर तूर, मूग अशा इतर धान्यांचा पुरवठा करण्यात येतो. पुरवठा करार संपल्याने ऑगस्ट 2017 पासून जिल्ह्यातील शाळांना ठेकेदारांकडून पुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक यांनी त्यांच्या स्तरावर धान्याची खरेदी करण्याच्या सूचना देऊन पुरवठा शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आला होता. अखेर शासनाकडून डिसेंबरमध्ये शाळांना धान्यपुरवठा करण्यासाठी पुरवठादारांची नेमणूक करण्यात आली. पुरवठादाराकडून दोन महिने पुरेल इतका पुरवठा करण्यात येत आहे. 

Web Title: nashik news school Grain supply