महापालिकेचा अजब फंडा शाळांची मैदाने पार्किंगसाठी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

नाशिक - पाल्याला शाळेत सोडायला- घेण्यासाठी येणाऱ्या पालकांना वाहने उभी करण्याचा महत्त्वाचा प्रश्‍न भेडसावतो. हे टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने शाळांची मैदानेच पार्किंगसाठी देण्याचा अजब फंडा अवलंबिला आहे. मैदानच उपलब्ध नसेल तर खेळायचे कुठे, हाच खरा प्रश्‍न आहे. 

नाशिक - पाल्याला शाळेत सोडायला- घेण्यासाठी येणाऱ्या पालकांना वाहने उभी करण्याचा महत्त्वाचा प्रश्‍न भेडसावतो. हे टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने शाळांची मैदानेच पार्किंगसाठी देण्याचा अजब फंडा अवलंबिला आहे. मैदानच उपलब्ध नसेल तर खेळायचे कुठे, हाच खरा प्रश्‍न आहे. 

पार्किंगचा गंभीर प्रश्‍न लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने २६२ शाळांना नोटिसा बजावत पार्किंगचा आपल्या मैदानावर बंदोबस्त करावा, अशा सूचना दिल्या. सुस्त, निर्ढावलेल्या प्रशासनाला नगरसेवक, पालकांनी विरोध करून मैदाने पार्किंगपासून वाचविण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले जात आहे. बाहेरील अनधिकृत वाहने ही शाळा व्यवस्थापनाच्यादृष्टीने डोकेदुखीचा विषय ठरणार आहे. यावरून वर्दळीच्या ठिकाणी असणारे पोलिस आणि पालक, वाहनचालक यांच्यात वाद, संघर्षसुद्धा होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

महापालिकेसह सर्वच शाळांच्या बाहेर होणाऱ्या अनधिकृत पार्किंगच्या प्रश्‍नांने सर्वांनाच ग्रासले आहे. त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर चर्चाही होत आहेत. पण त्यावर तोडगा निघत नाही. पालक, वाहनचालकांनी आपली वाहने व्यवस्थित उभी केली तर वाद, संघर्ष होण्याचा मुद्दाच नाही. पण वाहने इतरत्र उभी केल्यास पोलिसांनी कारवाई करण्याचा पर्याय सुचविल्याने पालक विरुद्ध पोलिस असा नवा संघर्ष होईल.

महापालिकेकडे तक्रारींचा वाढला ओघ
शाळांच्या परिसरात पालक पाल्यांना घेण्यास येतात. त्याचवेळी रस्त्यावर गर्दी होते. वाहनांची गर्दी होऊन वाहतूक ठप्प होणे, छोटे-मोठे अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. याच अनुषंगाने महापालिका व पोलिसांकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे. हे कारण देत महापालिकेच्या नगररचना विभागाने जानेवारीच्या प्रारंभी शाळा व्यवस्थापनाला नोटिसा पाठवून पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले होते. त्यासंदर्भात नगररचना विभागात नुकत्याच झालेल्या बैठकीला शंभरहून अधिक शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यात शाळांच्या बाहेर उभ्या राहणाऱ्या वाहनांची जबाबदारी शाळांची नसल्याची भूमिका घेण्यात आली. शाळांकडे मोकळी मैदाने आहेत. ती मैदाने पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्याचे मान्य करण्यात आले.

Web Title: nashik news school ground for parking