शाळेची खरेदी अन्‌ पावसाच्या सरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

नाशिक - आज (ता. १२) शाळा सुरू होणार असल्याने काल पालक अन्‌ पाल्यांची शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात लगबग होती. शाळांचे पोशाख, दप्तर अशा साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे. सायंकाळी आलेल्या पावसामुळे पालक, पाल्य आणि विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. 

शहरातील अनेक कपड्यांच्या दुकानांपुढे अमुक एका शाळेचे ड्रेस मिळतील, अशा पाट्या पाहायला मिळत आहेत. मुख्य रस्त्यावर शालेय साहित्याचे छोटे-मोठे स्टॉलही मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले आहेत. कंपासपेटी, वॉटरबॅग अशा अनेक प्लास्टिक साहित्याचे संचही उपलब्ध आहेत. ५० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत हे साहित्य उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत शालेय पोशाखाच्या किमती वाढल्या आहेत. दप्तरांचे ओझे कमी व्हावे यासाठी सॉफ्ट मटेरियलच्या बॅगला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ५०० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंतची शालेय दप्तरे उपलब्ध असून, आडव्या धाटणीची दप्तरे हद्दपार झाली आहेत. शालेय साहित्याची खरेदी अन्‌ पावसाच्या सरींमुळे बच्चेकंपनीचा आनंद दिसत होता. 

काही शाळांमध्ये शालेय साहित्य मिळत असल्याने मागणी कमी झाली असली, तरी क्‍लाससाठी दप्तरांना खरेदी करताना पालक दिसत आहेत. आडवी शालेय दप्तरे आता मागणी नसल्याने यंदा ती बाजारात दिसेनाशी झाली आहेत. 
- उमेश मालवी, विक्रेते

Web Title: nashik news school School shopping

टॅग्स