ऑनलाइन दाखल्यांत नाशिकचा दुसरा क्रमांक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

उत्तर महाराष्ट्रातून सहा लाख दाखले

उत्तर महाराष्ट्रातून सहा लाख दाखले
नाशिक - दाखले वितरणासाठीचे विभागाचे सर्व्हर वारंवार डाउन होत असूनही ऑनलाइन दाखले वितरणात नाशिक जिल्ह्याचा क्रमांक राज्यात दुसरा आहे. नगर जिल्हा ऑनलाइन दाखले वितरणात प्रथम क्रमांकावर असून, जळगाव चौथ्या क्रमांकावर आहे. वारंवार डाउन होणाऱ्या सर्व्हरवरून उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतून सहा लाख 19 हजार 497 दाखले वितरित झाले. दुसऱ्या क्रमांकावरील नाशिकमधून एक लाख 70 हजार ऑनलाइन दाखले वितरण झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात 85 हजार 893 उत्पन्न दाखले, राष्ट्रीयत्व व अधिवास 26 हजार 880, नॉन क्रिमिलेअर 20 हजार 80, स्थलांतरितांचे जात दाखले 18 हजार 993, प्रतिज्ञापत्र 12 हजार 146, सातबारा एक हजार 529 याप्रमाणे एक लाख 70 हजारांहून आधिक ऑनलाइन प्रमाणपत्रांचे वितरण झाले आहे. राज्यात प्रत्येक विभागासाठी एक सर्व्हर आहे. नाशिक विभागाच्या सर्व्हरला काही दिवसांपासून वारंवार अडचणी येतात. सतत डाउन होणाऱ्या या सर्व्हरची कामगिरी राज्यात मात्र चांगली आहे. राज्यात पहिल्या पाचमध्ये विभागातील तीन जिल्हे आहेत. उर्वरित दोन जिल्हे पहिल्या पंधरांत आहेत. नगर - 1,73,682, नाशिक - 1,70,760, पुणे - 1,43,213, जळगाव - 1,34,615, यवतमाळ - 1,26,398, औरंगाबाद - 1,21,904, जालना - 1,17,620, अमरावती - 1,12,438, कोल्हापूर - 1,05,668, बीड - 97,582, बुलडाणा - 92,394, अकोला - 77,319, लातूर - 74,285, नंदुरबार - 71,012, धुळे - 69,398 याप्रमाणे विभागातून सहा लाख 19 हजार 467 दाखल्यांचे वितरण झाले.

Web Title: nashik news second number nashik in online certificate