शस्त्रधारी सुरक्षारक्षक नियुक्तीला तात्पुरता ‘ब्रेक’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नाशिक - महापालिकेत शस्त्रधारी सुरक्षारक्षक नियुक्त करण्याच्या प्रक्रियेला स्थायी समितीने तात्पुरता ब्रेक लावला आहे. आयुक्तांकडून अन्य पर्याय तपासले जातील, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच निर्णय घेणार असल्याचे स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सांगितले.

प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा गेल्या महिन्यात महापालिकेत दौरा झाला होता. अपंगांच्या प्रश्‍नावर चर्चा सुरू असतानाच आयुक्त व कडू यांच्यात शाब्दिक वाद होऊन हात उचलण्यापर्यंत प्रकार गेला होता. यावरून महापालिकेच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता.

प्रशासनाकडून खासगी सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. ४५ सुरक्षारक्षकांसाठी वर्षभरासाठी एक कोटी ४३ लाख रुपयांना महासभेत मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीसमोर प्रस्ताव आल्यानंतर त्यास हरकत घेण्यात आली. महापालिकेकडे स्वतःचे सुरक्षारक्षक आहेत. त्यामुळे त्यांना सहा महिन्यांसाठी प्रशिक्षित करून बंदुकीचे परवाने द्यावे किंवा पोलिसांकडून सुरक्षा मागविता येईल, असे प्रवीण तिदमे यांनी सुचविले.

आयुक्तांकडून अहवाल मागविण्याच्या सूचना दिल्यानंतर प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला. पेस्ट कंट्रोल ठेकेदाराला दिलेल्या नोटिशीचे उत्तर, घरोघरी होणाऱ्या धुराळणीवर चर्चा झाली.

बहिरम, आहेर चौकशीला मुदतवाढ
अनधिकृत होर्डिंगच्या माध्यमातून महापालिकेचे उत्पन्न बुडविण्याचा आरोप ठेवत अतिक्रमण उपायुक्त रोहिदास बहिरम व वरिष्ठ लिपिक सुरेश आहेर यांच्यावर सुरू असलेल्या चौकशीला पुन्हा तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला. बहिरम यांच्या चौकशीसाठी आक्रमक भूमिका मांडणाऱ्या सदस्यांनी चौकशीलाच मुदतवाढ देताना आक्रमकपणा गायब झाल्याने चौकशी समितीतून काय निष्पन्न होईल, याबाबत चर्चा सुरू आहे. बहिरम व अहिरे यांना नैसर्गिक न्यायाने मुदतवाढ देण्याची सदस्यांनी मांडलेली भूमिका सर्वांना आश्‍चर्यचकित करणारी ठरली. भाजपचे नगरसेवक जगदीश पाटील यांनी विस्तृत चौकशी झाल्याशिवाय वास्तव बाहेर येणार नसल्याचे समर्थन केले. तर चारशे कागदपत्रांच्या अभ्यासासाठी विलंब लागत असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी केली.

बिटको रुग्णालयाचा अतिरिक्त खर्च
कोट्यवधी रुपये खर्च करून बिटको रुग्णालयाच्या आवारात समांतर इमारत बांधली जात आहे, परंतु नवीन इमारतीतील तळमजल्यात बाह्यरूग्ण विभाग कार्यरत केला जाणार आहे. दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर रुग्णांसाठी वॉर्ड बनवण्यासाठी भिंती तोडून मोकळी जागा निर्माण केली जाणार आहे. त्यामुळे यापूर्वी इमारतीसाठी केलेला खर्च वाया जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: nashik news security selection temperory break