'ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ही जबाबदारीच'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

इंदिरानगर - घरातीलच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाला जीवन जगताना दिशा देण्याचे काम ज्येष्ठ नागरिक त्यांच्या अनुभवाद्वारे करतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे ही सामुदायिक जबाबदारी आहे, असे मत आमदार सीमा हिरे यांनी पाथर्डी फाटा येथे व्यक्त केले.

येथील आधार ज्येष्ठ नागरिक संघाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शहर सुधारणा समितीचे सभापती भगवान दोंदे, नगरसेविका पुष्पा आव्हाड, माजी नगरसेवक सुदाम कोंबडे, अर्चना जाधव, एकनाथ नवले, डॉ. अमित कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. संघाचे अध्यक्ष त्र्यंबक सस्ते, सचिव प्रभाकर सोनार, भिकाजी जाधव यांनी स्वागत केले. डॉ. कोल्हे यांनी ज्येष्ठ नागरिकांवर केल्या जाणाऱ्या लेप्रोस्कोपिक व एन्डोस्कोपिक शस्त्रक्रिया, त्या केल्यानंतर काय काळजी घ्यावी, याची माहिती दिली. गीता माळी यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. 

वयाची ७५ वर्षे पूर्ण करणारे संघाचे सदस्य यणूबाई दोंदे, वसंत दोंदे, हरिभाऊ गांगुर्डे, विमलबाई गांगुर्डे, प्रल्हाद तावडे, माधव भिडे, लता शेटे, रामदास कोतकर, द्वारकाबाई जाधव व हुसेन शेख यांचा सत्कार करण्यात आला. समारंभासाठी सहकार्य करणारे सभापती दोंदे यांचा विशेष सत्कार झाला. या वेळी साहेबराव आव्हाड, अरुणा मुर्तडक, सीताराम देवरे, रमेश केदार, सुधाकर दिघे, प्रताप राजपूत, मोतीलाल सोनवणे, बापू बोरसे, लालचंद कपाटे, गौतम दोंदे, संदीप दोंदे आदींसह सदस्य व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Web Title: nashik news Senior Citizens