पिंपळगाव खांब मलनिस्सारण केंद्राला मान्यता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

नाशिक - गेल्या आठ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या पिंपळगाव खांब येथील महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्राला राज्य सरकारच्या तांत्रिक समितीकडून मान्यता मिळाली आहे. ५६ कोटी रुपये या प्रकल्पासाठी मिळणार असून, केंद्र सरकारच्या अमृत योजनेत प्रकल्पाचा समावेश झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे ५०, राज्य सरकारचे २०, तर महापालिकेला ३० कोटींचा निधी खर्च करावा लागणार आहे. त्यापूर्वी महापालिकेला मलनिस्सारण केंद्राच्या जागेसाठी निधी खर्च करावा लागेल.

शहरात २०४१ मधील वाढलेली लोकसंख्या गृहीत धरून जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेत गंगापूर व पिंपळगाव खांब येथे अनुक्रमे १८ व ३६ दशलक्ष लिटर क्षमतेची मलनिस्सारण केंद्रे मंजूर झाली होती. दोन्ही केंद्रांच्या जागेबाबत अडचण निर्माण झाली होती. गंगापूर एसटीपीच्या जागेचे आरक्षण बदलल्याने वादाचा मुद्दा ठरला होता. तांत्रिक अडचणी पार पडल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी गंगापूरचे काम सुरू झाले आहे. पिंपळगाव खांब केंद्राला नागरिकांनी विरोध केला आहे. त्यातील काहींना जागेचा मोबदला द्यायचा आहे, तर काहींनी गावात एसटीपी नकोच, अशी भूमिका घेतली आहे. भूसंपादनासाठी गेलेल्या काही अधिकाऱ्यांना पिटाळलेही होते. 

महापालिकेने पिंपळगाव खांब केंद्राचा ७५ कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. नंतर त्यात सुधारणा करून ६४ कोटींचा अंतिम प्रकल्प अहवाल सादर केला. मात्र, शासनाने त्यात आणखी आठ कोटी रुपये कमी करून ५६ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र, भूसंपादनाचा मोबदला महापालिकेच्या माथी मारला आहे.

आज अंतिम मोजणी
पिंपळगाव खांब येथे पाच हेक्‍टर जागेवर प्रकल्प साकारला जाणार आहे. त्यासाठी अंतिम मोजणी गुरुवारी (ता. १०) करण्याचे निश्‍चित केले आहे. ग्रामस्थांकडून विरोध होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त मागविला जाणार आहे. सकाळी अकराला तलाठी कार्यालयात अंतिम मोजणी होईल.

Web Title: nashik news Sewerage

टॅग्स