थेट सरपंच निवडणुकीत शिवसेनेची बाजी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

नाशिक - नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील थेट नगराध्यक्ष निवडीचा सर्वाधिक लाभ राज्यात भाजपला झाला होता. यामुळे याच यशाची ग्रामपंचायत निवडणुकीत पुनरावृत्ती करण्याचे मनसुबे घेऊन राज्यात पहिल्यांदाच थेट सरपंच निवडीचा राबविलेला फंडा नाशिक जिल्ह्यात तरी भाजपच्या अंगाशी आला आहे. नांदगाव तालुक्‍यातील 15 पैकी दहा ग्रामपंचायतींची सत्ता मिळवून शिवसेनेने भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला. एकलहरेत सर्वाधिक जागा मिळवूनही सरपंचपद हातातून गेल्याने परिवर्तन करण्याचे भाजपचे स्वप्न अधुरेच राहिले. 

नाशिक - नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील थेट नगराध्यक्ष निवडीचा सर्वाधिक लाभ राज्यात भाजपला झाला होता. यामुळे याच यशाची ग्रामपंचायत निवडणुकीत पुनरावृत्ती करण्याचे मनसुबे घेऊन राज्यात पहिल्यांदाच थेट सरपंच निवडीचा राबविलेला फंडा नाशिक जिल्ह्यात तरी भाजपच्या अंगाशी आला आहे. नांदगाव तालुक्‍यातील 15 पैकी दहा ग्रामपंचायतींची सत्ता मिळवून शिवसेनेने भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला. एकलहरेत सर्वाधिक जागा मिळवूनही सरपंचपद हातातून गेल्याने परिवर्तन करण्याचे भाजपचे स्वप्न अधुरेच राहिले. 

नांदगाव तालुक्‍यात आवाज शिवसेनेचाच 
आज निकाल जाहीर झालेल्या 15 पैकी 10 ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारून विरोधकांना चारीमुंड्या चीत केले. तालुक्‍यातील नागापूर, मूळडोंगरी, बोयेगाव, भार्डी, नवसारी, धनेर, तळवाडे, शास्त्रीनगर, हिरेनगर, कसाबखेडा या ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्या चांडक प्लाझा येथील संपर्क कार्यालयात नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांची मेहनत आणि नागरिकांनी दाखविलेल्या विश्‍वासामुळेच शिवसेनेला हे घवघवीत यश मिळाल्याची प्रतिक्रिया श्री. कांदे यांनी दिली. 

एकलहरेत सर्वाधिक जागा, तरीही  परिवर्तन घडविण्यात भाजप अपयशी  
संपूर्ण नाशिक तालुक्‍याचे लक्ष लागलेल्या एकलहरे ग्रामपंचायतीत भाजपप्रणीत परिवर्तन पॅनलला 17 पैकी सर्वाधिक दहा जागा मिळाल्या. पण सरपंचपद जिल्हा परिषद सदस्य शंकर धनवटे आणि राजाराम धनवटे यांच्या गटाकडे गेल्यामुळे सत्तापरिवर्तन करण्याचे भाजपचे मनसुबे उधळले गेले. धनवटे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलच्या मोहिनी जाधव सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे आणि मोहन निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलला सर्वाधिक जागा मिळाल्या, पण सरपंचपद विरोधी गटाला मिळाल्याने सत्तेने हुलकावणी दिली आहे. 

लाडचीच्या सरपंचपदी रेखा कडाळे 
लाडचीच्या सरपंचपदी रेखा कडाळे निवडून आल्या. तेथे ग्रामपंचायतीच्या 11 पैकी 4 जागांवर उमेदवारच मिळाले नव्हते. 

साडगाव - इंदू पारधी सरपंच 
साडगावच्या सरपंचपदी इंदू सुभाष पारधी निवडून आल्या. अनुसूचित जमातीसाठी सरपंचपद राखीव होते. इतर सात जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

तळेगाव अंजनेरीला मंगला निंबेकर 
तळेगाव अंजनेरी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत मंगला संजय निंबेकर यांनी थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून येण्याचा बहुमान मिळवला. 

मोहपाड्यात "कमळ' फुलले 
एकीकडे जिल्ह्यातील निवडणुकीत भाजपला यश मिळालेले नसताना, मालेगाव तालुक्‍यातील मोहपाडा ग्रामपंचायतीवर भाजपच्या कर्मवीर हिरे पॅनलचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले. सरपंचपदाच्या उमेदवारासह मोहपाडा ग्रामपंचायतीची सत्ता मिळाल्यामुळे पॅनलचे नेते अद्वय हिरे यांनी मोहपाडावासीयांचे आभार मानले. 

दहीवडला आपलं पॅनलला सर्वाधिक जागा, पण सरपंचपदाची हुलकावणी  
दहीवड (ता. देवळा) ग्रामपंचायतीत आपलं पॅनलने 15 पैकी 11 जागा जिंकल्या. पण थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आदिनाथ सूर्यवंशी यांनी बाजी मारल्याने आपलं पॅनलवर गड आला, पण सिंह गेला, अशी स्थिती झाली. 

Web Title: nashik news shiv sena sarpanch election