सिडकोची घरे "फ्री होल्ड' करा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

सिडको - सिडकोची घरे 99 वर्षे कराराच्या लीजऐवजी "फ्री होल्ड' करून त्याची संपूर्ण मालकी घरधारकाला मिळावी आणि घर हस्तांतर करताना 27 हजारांची जाचक वसुली थांबवावी, या मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे गुरुवारी (ता. 22) सिडको प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासकांना निवेदन देण्यात आले. 

सिडको - सिडकोची घरे 99 वर्षे कराराच्या लीजऐवजी "फ्री होल्ड' करून त्याची संपूर्ण मालकी घरधारकाला मिळावी आणि घर हस्तांतर करताना 27 हजारांची जाचक वसुली थांबवावी, या मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे गुरुवारी (ता. 22) सिडको प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासकांना निवेदन देण्यात आले. 

उपनेते बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख महेश बडवे, सचिन मराठे, नाशिक पश्‍चिम विधानसभा संपर्कप्रमुख नीलेश चव्हाण, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, पश्‍चिम विधानसभाप्रमुख प्रवीण तिदमे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या निमित्ताने शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. 

उत्तमनगर येथून सकाळी मोर्चाला सुरवात झाली. विजयनगर, दत्तचौक, महाराणा प्रताप चौक, शिवाजी चौक, लेखानगरमार्गे मोर्चा सिडको प्रशासकीय कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी भगवे ध्वज, पताका लावून वातावरणनिर्मिती करण्यात आली. सिडकोचे प्रशासक अनिल झोपे यांनी या वेळी निवेदन स्वीकारले. मोर्चा यशस्वितेसाठी सुनील पाटील, सचिन राणे, शंकर पांगरे, लोकेश गवळी, भागवत आरोटे, बबलू सूर्यवंशी, योगेश पाटील, गोकुळ निगळ, राजेंद्र मोहिते, गोकुळ नागरे, योगेश गांगुर्डे, देवा जाधव, सुयश पाटील आदींनी परिश्रम घेतले. मोर्चात सिडको प्रभाग समिती सभापती सुदाम डेमसे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, रत्नमाला राणे, सुवर्णा मटाले, दीपक दातीर, श्‍यामकुमार साबळे, कल्पना पांडे, हर्षाताई बडगुजर, संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, सीमा निगळ, मंदाताई दातीर, राहुल ताजनपुरे, देवानंद बिरारी, दादाजी अहिरे, मामा ठाकरे, सुभाष गायधनी, सुधाकर जाधव, संजय भामरे, शीतल भामरे, सुमन सोनवणे, सुहास खर्डे, विलास पाटील, अश्‍विन जामदार, आकाश शिंदे, स्वप्नील पांगरे आदी सहभागी झाले होते. या मोर्चामुळे शिवसैनिकांत प्रचंड उत्साह दिसून आला. मोर्चासाठी अंबड पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली नऊ सहाय्यक पोलिस निरीक्षक, 60 कर्मचारी, 15 महिला कर्मचारी आणि वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. 

दरम्यान, शिवसेनेने केलेल्या मागण्यांबाबत मुख्य कार्यालय आणि शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. शासनही त्याबाबत सकारात्मक आहे, असे अनिल झोपे यांनी सांगितले.

Web Title: nashik news shivsena Cidco home