शिवसेना गुजरातमध्ये लढणार नाही - राऊत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

नाशिक - उत्तर प्रदेश व गोवा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपविरोधात दंड थोपटणाऱ्या शिवसेनेने गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपशकुन करायचा नाही अशी भूमिका घेतली. शिवसेना गुजरातमध्ये निवडणूक लढणार नसल्याचे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सोमवारी येथे जाहीर केले.

नाशिक - उत्तर प्रदेश व गोवा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपविरोधात दंड थोपटणाऱ्या शिवसेनेने गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपशकुन करायचा नाही अशी भूमिका घेतली. शिवसेना गुजरातमध्ये निवडणूक लढणार नसल्याचे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सोमवारी येथे जाहीर केले.

मुख्यमंत्र्यांना बालीश म्हणून हिणवणारे शरद पवार शिवसेनेनंतर भाजपला पाठिंबा देणार नसल्याचा दावाही त्यांनी केला.

शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीचा भाग म्हणून दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या राऊत यांनी शासकीय विश्रामगृहावर आज पत्रकार परिषद घेतली. राज्यात भाजप - शिवसेनेची सत्ता आल्यानंतर दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये दररोज खटके उडत आहेत. गुजरातमध्ये होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवार उभे करून भाजपला अडचणीत आणले जाईल, या विषयावर बोलताना राऊत म्हणाले की, गुजरातमध्ये स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची शिवसेनेची इच्छा आहे; परंतु शिवसेना निवडणुकीत भाग घेणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे "होम पीच' असल्याने त्यावर अपशकुन करण्याची इच्छा नाही. आमचे काही विषयांवर मतभेत असतील; परंतु इतक्‍या खालच्या थराला शिवसेना कदापि जाणार नाही.

राहुल गांधींची स्तुती
राऊत यांनी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची स्तुती केली. 'त्यांच्यात लक्षणीय बदल झाले आहेत. तीन वर्षांपूर्वी लोक त्यांना ऐकत नव्हते, टीव्ही बंद करायचे. आता तेच लोक राहुल यांना ऐकण्यासाठी उत्सुक असतात. भविष्यात राहुल कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्यास ते देशाचे नेते होतील,'' असे भाकीत त्यांनी वर्तविले. विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस आता जागा झाल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

राऊत म्हणाले...
- "मुदतपूर्व' शक्‍यता नाही, भाजपमधून अफवा
- निवडणुका झाल्या तरी शिवसेना तयार
- सत्तेसाठी कॉंग्रेस, "राष्ट्रवादी'कडून पैशांचा वापर, भाजप तेच करते
- शिवसेनेचा प्रमुख विरोधक भाजपच
- शिवसेना सत्तेत; परंतु सत्ता भाजपच्या मालकीची
- लोक सरकारवर समाधानी नाहीत
- नोटाबंदी, "जीएसटी'चा सर्वाधिक फटका

Web Title: nashik news Shivsena will not contest in Gujarat