'सांस्कृतीक कार्यक्रमांमधून भविष्यात चांगले कलावंत घडतील'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

सिन्नर (नाशिक): सांस्कृतीक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून भविष्यातील चांगले कलावंत घडतील. पालकांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले.

सिन्नर (नाशिक): सांस्कृतीक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून भविष्यातील चांगले कलावंत घडतील. पालकांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले.

पिपल्स एज्युकेशन ऍण्ड वेलफेअर सोसायची संचलित किझ्झ ऍकेडमी या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक गुणगौरव सोहळा नुकताच पार पडला पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षसाठी सुरगाणा संस्थानचे राजे श्रीमंत रोहितराजे तेजसिंहराजे देशमुख-पवार होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्यामधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी संस्थेने चांगले पाऊल टाकले आहे, असे रोहितराजे तेजसिंहराजे देशमुख-पवार म्हणाले.

यावेळी नगराध्यक्ष किरण डगळे, नगरसेवक शैलेश नाईक, मास्टर शेफच्या मिनू धाम, सिबल सोनवणे, प्रज्ञा थोरात, रेश्मा शिंदे, हेमंत बोरस्ते, संस्था शिक्षण समितीचे अध्यक्ष व माजी प्राचार्य डॉ. आर. डी. पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शाळेत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती चित्रफितीद्वारे दाखविण्यात आली. सांस्कृतीक कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्राचार्य निती दवे, व्यवस्थापक सचिन गुरुळे, अरुण जेडगुले, रश्मी तुपे, कृपल चासकर, संगिता परमार, प्रिती खोडे, सविता गिरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Web Title: nashik news sinnar kids academy annual fun day