सीतागुंफा, रामशेज किल्ला भुयाराची ‘पुरातत्त्व’ घेणार माहिती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

पंतप्रधान कार्यालयाकडून देवांग जानी यांच्या पत्राची दखल; रामायणकालीन संदर्भ पुढे येण्यास मदत

नाशिक - सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवत सीतागुंफा ते रामशेज किल्ल्यादरम्यानच्या भुयार मार्गाचा शोध घेत विकास करावा, अशी मागणी केली होती. त्यावरून पंतप्रधान कार्यालयाने पुरातत्त्व विभागाला लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गेझेटर बाँबे प्रेसिडेन्सी-नाशिक १८८३ च्या कि टू नाशिक-त्र्यंबक १९४१-१९४२ या दोन्ही पुस्तकांतील संदर्भानुसार श्री. जानी यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की रामायण सर्किट योजनेत श्रीरामाचे वास्तव्य असलेल्या पंचवटी भागातील सीतागुंफा ते रामशेज किल्ला हा भाग येतो. वनवासात असताना श्रीराम बाहेर सीतागुंफाचा वापर करत, सीतागुंफामध्ये पूर्वेच्या खोलीत महादेवाचे मंदिर आहे, त्यात तीन इंचाचे शिवलिंग आहे. गुंफातील सर्व खोली आणि मंदिरात सूर्यप्रकाश किंवा हवा येत नाही. महादेव मंदिरामागे सीतागुंफा ते रामशेज किल्ला असा भुयारी मार्ग आहे. या मार्गाचा वापर श्रीराम रामशेज किल्ल्यावर जाण्यासाठी करत. 
 
मोगलांपासून संरक्षित राहिल्याने रामशेज अजय
 रामशेज किल्ला म्हणजे रामशय्या किंवा रामशयन कक्ष जिथे श्री राम भगवान झोपायला जात असत, अशी आख्यायिका आहे. रामशेज किल्ला संभाजी राजे आणि मराठा सत्ताधिशांनी मोगलापासून संरक्षित ठेवला. त्यामुळे अखेरपर्यंत अजय राहिलेल्या रामशेज किल्ला व त्यातील भुयारी मार्गाचा शोध घ्यावा व ते खुले करण्यासाठी पुरातत्त्व विभागाला आदेश द्यावेत, अशी मागणी जानी यांनी केली. त्यानुसार पुरातत्त्व विभागाला पुढील योग्य कारवाईसाठी आदेश दिले आहेत. साधारण १४० वर्षांपेक्षा अधिक काळापासून भुयारी मार्ग बंद आहे. केंद्राने यात लक्ष घातल्यास रामायणकालीन संदर्भ पुढे येण्यास मदत होणार आहे.

Web Title: nashik news sitagumpha, ramshej fort secrete entrance information