नाशिक जिल्ह्यात नव्या वर्षात सहा शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

नाशिक - गेल्या वर्षी विक्रमी १०४ आत्महत्या झालेल्या नाशिक जिल्ह्यात नव्या वर्षातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. निफाड तालुक्‍यातील आणखी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सोमवारी (ता. २२) उघड झाले. त्यामुळे यंदा २२ दिवसांत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या सहा झाली आहे.

नाशिक - गेल्या वर्षी विक्रमी १०४ आत्महत्या झालेल्या नाशिक जिल्ह्यात नव्या वर्षातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. निफाड तालुक्‍यातील आणखी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सोमवारी (ता. २२) उघड झाले. त्यामुळे यंदा २२ दिवसांत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या सहा झाली आहे.

निफाड तालुक्‍यातच हे प्रमाण जास्त आहे. निफाड येथील अमोल भाऊसाहेब गाजरे (वय २५) या तरुणाने रविवारी (ता. २१) रात्री सव्वाआठच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केली. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी (ता. २२) सकाळी सहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. अमोल यांच्या वडिलांच्या नावे शेती आहे. दुसऱ्या घटनेत दिंडोरे (ता. निफाड) येथे विनायक नानासाहेब शिरसाठ (वय ३९) यांनी शनिवारी (ता. २०) दुपारी अडीचच्या सुमारास विष प्राशन केले होते. त्यांचाही सोमवारी (ता. २२) उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचे वडील नानासाहेब शिरसाठ यांच्या नावे १.४ हेक्‍टर जमीन आहे. निफाडच्या तहसीलदारांकडून दोन्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्राथमिक अहवाल जिल्हा यंत्रणेला प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात यंदा शेतकरी आत्महत्येची सुरवात औरंगपूर (ता. निफाड) येथील बाजीराव चिखले (वय ४०) यांच्या आत्महत्येपासून झाली. त्यानंतर बागलाण तालुक्‍यातील कृष्णा वाघ (वय ५३, रा. निकवेल) व अशोक काकुळते (वय ५२, रा. कंधाने), तसेच, नारायण शेवाळे (वय ४०, रा. खामखेडा, ता. देवळा) यांनी आत्महत्या केल्या. याशिवाय शेतकरी कुटुंबातील १७ वर्षांच्या युवतीसह एका २३ वर्षांच्या नवविवाहितेनेही याच कालावधीत आत्महत्या केली आहे. मात्र ठोस अहवाल आलेला नसल्याने त्याविषयी अद्याप जिल्हा यंत्रणेकडे नोंद नाही.

Web Title: nashik news six farmer suicide in nashik district last year