शहराला स्काडा तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जानेवारी 2018

नाशिक - स्मार्टसिटीअंतर्गत येत्या दोन वर्षांत शहरात स्काडा तंत्रज्ञानावर आधारित पाणीपुरवठा केला जाणार आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शहरात दोन लाखांहून अधिक पाण्याचे अत्याधुनिक मीटर बसविले जाणार असून, स्वयंचलित मीटर रीडिंगच्या माध्यमातून ग्राहकांना मोबाईलवर पाण्याचे बिल उपलब्ध होईल. त्यासाठी २८० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला.

शहरात पाणी वितरणात अनेक त्रुटी आढळल्या. नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालातून ४० टक्के पाणीगळती होत असल्याचे निर्दशनास आले. त्याशिवाय वर्षाला पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च होतात, पण त्या तुलनेत उत्पन्न मिळत नसल्याने महापालिकेने स्मार्टसिटीअंतर्गत स्काडा तंत्रज्ञानावर आधारित पाणी वितरण व बिलांची योजना आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. त्यासाठी २८० कोटी रुपये खर्च होणार आहेत. शहरात दोन लाखांवर स्वयंचलित रीडिंग मीटर बसविले जाणार आहेत.

स्काडा तंत्रज्ञानाचे फायदे
मानवी पद्धतीने मीटर रीडिंग घेण्याची पद्धत बंद होणार
ग्राहकांना पाणीवापरानुसार देयके
सरासरी पाण्याची देयके देण्याची पद्धत बंद होणार
मीटरमध्ये छेडछाड केल्यास सेंट्रल सर्व्हरवर समजणार
मीटर नादुरुस्त व बंद असल्याच्या तक्रारींना पायबंद
महापालिकेच्या महसुलात वाढ होईल
पाणीगळती व चोरी शोधता येणार
कुठल्या भागात किती पाणी पोचते, याबाबत समजणार

असे चालेल काम
ऑटोमॅटिक रीडिंग मीटर(एआरएम)चे रीडिंग घेण्याच्या दोन पद्धती आहेक. एका वाहनावर अल्ट्रॉसॉनिक रीडिंग मीटर बसविल्यास साधारणतः एका भागातील तीनशे मीटर परिघातील सर्व पाणीमीटरचे रीडिंग घेऊन थेट सेंट्रल सर्व्हरवर डाउनलोड होईल. त्या रीडिंगनुसार ग्राहकांना वीजबिल दिले जाईल. मोबाईलवर ‘एसएमएस’च्या माध्यमातून व मेलद्वारेसुद्धा ग्राहकांना पोचेल.

Web Title: nashik news skada technology smart water supply