स्मार्ट प्रकल्पांना नववर्षात गती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

नाशिक - स्मार्टसिटीमध्ये सर्वांत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दोन प्रकल्पांना जानेवारी महिन्यात गती मिळणार आहे. माहिती व तंत्रज्ञानावर आधारित १२० कोटी, तर गोदा प्रकल्पाच्या १८० कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा काढल्या जाणार असून, स्मार्टसिटीच्या एसपीव्ही कंपनीच्या दृष्टीने मोठी संधी आहे.

गेल्या महिन्यात स्मार्टसिटी कंपनीची बैठक होऊन त्यात माहिती व तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार या आठवड्यात निविदाप्रक्रिया राबविली जाणार आहे. माहिती व तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांमध्ये सीसीटीव्हीचे कमांड ॲन्ड कन्ट्रोल सिस्टिम, इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम, स्मार्ट पार्किंग, सिटीझन एक्‍सपिरीयन्स सेंटर, स्मार्ट किऑक्‍स, सेन्सर, पब्लिक ड्रेस सिस्टिम आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत.

त्यासाठी १२० कोटी रुपये खर्च होणार आहे. तीन टप्प्यांत प्रोजेक्‍ट गोदा राबविला जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात ग्रीन फिल्ड विकसित केला जाणार आहे. पहिल्या व दुसऱ्या फेजमध्ये १८० कोटी रुपयांच्या निविदा काढल्या जाणार आहेत. प्रोजेक्‍ट गोदामध्ये गोदावरीचे सौंदर्यीकरण, दोन्ही तिरांवरील सुशोभीकरण, जेटी, कारंजे, पुलांची निर्मिती, कॅफेटेरिया आदींचा समावेश आहे.

स्मार्टसिटी कामांचा आढावा
स्मार्टसिटीमध्ये समाविष्ट झालेल्या राज्यातील महापालिकांच्या कामकाजाचा आढावा बुधवारी (ता. ३) घेतला जाणार आहे. मुंबईत केंद्रीय शहर विकास विभागाचे सचिव कामकाजाचा आढावा घेणार आहेत. स्मार्टसिटीमधील नियोजित प्रकल्प व सध्याच्या कामांची प्रगती याबाबत माहिती घेतली जाणार आहे. नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा अहवाल सादर करतील.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news smart project speed