नाशिक: अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका होणार 'स्मार्ट रोड'

smart road in Nashik
smart road in Nashik

नाशिक छ केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने दिलेल्या सूचनेनुसार स्मार्टसिटीअंतर्गत शहरातील अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाक्‍यापर्यंतचा रस्ता "स्मार्ट रोड' म्हणून विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. नेहरू उद्यान व महात्मा फुले कलादालनाचे पुनर्निर्माण, स्मार्टसिटी सोल्यूशन योजनेत नाशिकचा सहभाग व विद्युत शवदाहिनी या विषयांना आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे स्मार्टसिटी प्रकल्पांना गती मिळणार आहे.

स्मार्टसिटीच्या एसपीव्ही कंपनीची चौथी बैठक आज अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत झाली. कंपनीचे संचालक आयुक्त अभिषेक कृष्णा, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आदी उपस्थित होते. तीन कोटी वीस लाख रुपयांतून महात्मा फुले कलादालनाचे रूपडे पालटले जाईल. व्हिडिओ वॉल, सीसीटीव्ही कॅमेरे, वातानुकूलित सभागृह, आर्ट गॅलरी आदी सुविधा दिल्या जातील.

स्मार्ट रोड लक्ष वेधणार
केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने स्मार्टसिटीअंतर्गत स्मार्ट रोड तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअंतर्गत शहरात अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका सिग्नलदरम्यानच्या 1.2 किलोमीटरचा रस्ता "स्मार्ट रोड' म्हणून घोषित करण्यात आला. स्मार्ट रोड विकसित करताना आधुनिक पद्धतीचे सिग्नल, पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग, सीसीटीव्ही कॅमेरे, दुभाजक, सायकल ट्रॅक, जंक्‍शन व क्रॉसिंग विकसित करणे यांसारख्या नवीन संकल्पना अमलात येईल.

नेहरू उद्यानाजवळील अतिक्रमण हटविणार
स्मार्टसिटीअंतर्गत नेहरू उद्यान विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. उद्यान पुनर्निर्माणाची निविदाप्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली. एक कोटी दोन लाखांचा हा प्रकल्प आहे. नेहरू उद्यानात स्मार्ट पोल, व्हिडिओ वॉल, बेंचेस, पादचारी मार्ग आदी सुविधा केल्या जातील. त्यापूर्वी नेहरू उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्या हटविल्या जाणार आहेत. उद्यानाच्या मागील बाजूला महापालिकेने टपऱ्यांसाठी जागा दिल्या आहेत. त्याऐवजी तेथे गाळे बांधले जाणार आहेत.

महापालिकेचा "निशा' प्रकल्प
नाशिक इंटिग्रेटेड स्मार्ट हेल्थ ऍप्रोच अर्थात, "निशा' या नावाने महापालिकेने स्मार्टसिटीत अंतर्भूत केलेल्या प्रकल्पांच्या स्पर्धेत भाग घेतला आहे. स्मार्टसिटीच्या अनुषंगाने महापालिकेने "टीसीएस'च्या माध्यमातून विकसित केलेले मातृत्व, रक्तपेढी, किऑक्‍स, चाइल्ड हेल्थ ऍप्लिकेशन स्पर्धेत सादर केले जाईल. या स्पर्धेत यश मिळाल्यास महापालिकेला केंद्र सरकारकडून साठ लाख रुपये मिळू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com