चिमुरड्यांनी फुलविला चिमणा-चिमणीचा संसार

राजेंद्र बच्छाव
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

दोन शाळकरी भावांची तीन महिन्यांची मेहनत सफल
इंदिरानगर - इंदिरानगरच्या जॉगिंग ट्रॅकजवळ असलेल्या शिवसृष्टी कॉलनीमधील जयश्री आर्केडच्या ‘ए’ विंगमधील तिसऱ्या मजल्यावर सहा क्रमांकाच्या सदनिकेत राहणारे राहुल व गौरी जोशी आणि त्यांची दोन मुले गीतेश आणि कवीश सध्या आनंदोत्सव साजरा करीत आहेत. कारणही तसेच आहे, चिमणा-चिमणीच्या संसाराला त्यांनी हातभार लावला होता.

आदर्श बालविद्या मंदिरात सातवीत शिकणारा गीतेश आणि तिसरीत असणारा कवीश यांनी गेले तीन महिने घराच्या खिडकीत ठेवलेल्या आणि काळजी घेतलेल्या पिंजऱ्यात सध्या चिमणा व चिमणीचा संसार फुलला आहे. नुकतीच त्यांना पिल्ले झाल्याने ही भावंडे कमालीची आनंदित आहेत. घरात असलेला रिकामा पिंजरा त्यांनी येथे ठेवला. आई-बाबांची परवानगी घेऊन दररोज तेथे दाणे आणि पाणी ठेवणे सुरू केले. सुरवातीला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. चुकून एखादी चिमणी यायची आणि क्षणभर थांबून उडून जायची. शाळेतून आले, की आईला सर्वांत पहिला प्रश्‍न, चिमणी आली होती का?

दररोज पाणी व दाणे बदलणे मात्र सुरूच होते. महिन्यानंतर चिमणी व चिमणा येथे सातत्याने येऊ लागले. तसा यांचादेखील हुरूप वाढला आणि दररोजची डेव्हलपमेंट बघण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक राहू लागला. सुरवातीला तटस्थ असणारे महिंद्र कंपनीत नोकरीला असणारे राहुलदेखील यात ओढले गेले. बघता बघता या चिमण्यांच्या जोडप्याने या पिंजऱ्याभोवती सुंदर घरटे तयार करण्यास सुरवात केली. त्याची प्रगती हे कुटुंब बघत होते आणि त्यांना त्रास नको अशा पद्धतीने घरातील व्यवहार करत होते. त्यासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी पडदा ओढण्यात आला. अखेर घरटे पूर्ण झाले. सुबक घरटे झाल्यानंतर चार-पाच दिवसांपूर्वीच घरट्यातून चिवचिवाट ऐकू आल्याने जोशी कुटुंबाला मोठा आनंद झाला. हा चिवचिवाट खूप सुखावतो आहे, असे सर्वांचे म्हणणे असून, जोपर्यंत हे कुटुंब येथे राहील तोपर्यंत त्यांची सर्वतोपरी काळजी घेण्याचा मानस सर्वांनी व्यक्त केला.

Web Title: nashik news sparrow life settle by child

टॅग्स