आयोग की वेतन करारासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे मतदान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

नाशिक - राज्यभरातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) कर्मचाऱ्यांना अन्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेतर्फे दोनदिवसीय मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार आज 75 टक्‍के मतदान झाले असून, उद्या (ता. 27) सायंकाळपर्यंत 95 टक्‍क्‍यांपर्यंत मतदान होईल, असा दावा एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव प्रमोद भालेकर यांनी केला आहे.

या प्रक्रियेला महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस कामगार संघटना (इंटक), महाराष्ट्र मोटर फेडरेशन, कनिष्ठ वेतन श्रेणी कामगार संघटनेसह अन्य संघटनांनी पाठिंबा दिला आहे. दोनदिवसीय मतदान प्रक्रियेत आज पहिल्या दिवशी प्रशासनाने आगारात मतदान राबविण्यास विरोध केल्यानंतर आगराबाहेर प्रक्रिया राबविण्यात आली.

Web Title: nashik news st employee voting for commission or salary agreement