एसटीच्या वेतनवाढीवर 29 जानेवारीला सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

नाशिक - राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा आणि अन्य मागण्यांबाबत उच्च न्यायालयात दाखल याचिकांवर 29 जानेवारीस पुढील सुनावणी होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी गेल्या ऑक्‍टोबरमध्ये कर्मचाऱ्यांनी राज्यभर संप केला होता. त्या वेळी न्यायालयाने संप बेकायदा ठरवत प्रशासनाला उच्चस्तरीय समिती स्थापन करून महामंडळाच्य्या आर्थिक स्थितीबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिला होता. आज न्यायाधीश राजेश केतकर, आर. एम. बोर्डे यांच्यासमोर सुनावणी झाली.
Web Title: nashik news st payment increment result