पुढील आठवड्यात ‘समृद्धी’ची मोजणी शक्‍य

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

नाशिक - राज्यातील नऊ तहसीलदारांच्या राज्य रस्ते विकास महामंडळत भूमी व्यवस्थापकपदावर प्रतिनियुक्तीवर बदली झाली आहे. त्यात जिल्ह्यातील दोन, तर विभागातील तीन तहसीलदारांचा समावेश आहे. शेतकरी संपापासून थंडावलेल्या नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या रखडलेल्या कामाला पुढील आठवड्यापासून पुन्हा गती येण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांत जमिनीचे दरनिश्‍चितीचे काम पूर्णत्वास आले आहे. नाशिकला हे काम अंतिम टप्प्यात आहे. समृद्धी महामार्गाच्या रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पुन्हा एकदा कामाला गती आली आहे. शासनाने जमीन महसुलीच्या कामासाठी जादा अधिकारी वर्ग करण्यास सुरवात केली आहे. राज्यातील नऊ तहसीलदार राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील बबन काकडे व मीनाक्षी राठोड (चव्हाण) यांचा समावेश आहे, तर नगर जिल्ह्यातील कैलास कडलग, असे तीन तहसीलदार भूमी व्यवस्थापक म्हणून नव्या पदावर रुजू होण्याचे आदेश आहेत. संपादित जमिनीच्या व्यवस्थापन, खरेदीसह तत्सम प्रक्रियेच्या प्रशासकीय कामासाठी व्यवस्था उभारण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पुन्हा रखडलेले जमिनीच्या मोजणीचे कामकाज सुरू होईल, अशी शक्‍यता आहे.

Web Title: nashik news State Road Development Corporation