एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची आत्महत्त्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नाशिक - गंगापूर रस्त्यावरील व्ही. एन. नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत विद्यार्थिनीने आत्महत्या केली. काजल संजय साळवे (वय 17, रा. शिवाजीनगर, सातपूर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. 

नाशिक - गंगापूर रस्त्यावरील व्ही. एन. नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत विद्यार्थिनीने आत्महत्या केली. काजल संजय साळवे (वय 17, रा. शिवाजीनगर, सातपूर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. 

काजल ही व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील बारावी वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी होती. महाविद्यालयात बारावीची परीक्षा सुरू असल्याने ती सकाळीच घरातून बाहेर पडली होती. परीक्षेनंतर तिने आज सकाळी अकराच्या दरम्यान महाविद्यालयाच्या आवारातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेतली. या घटनेत तिचे दोन्ही हात, पाठीचा कणा मोडला, तसेच डोक्‍याला गंभीर दुखापत झाली होती. महाविद्यालयाचे ग्रंथपाल भाऊसाहेब त्र्यंबक केदार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी काजलला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील कारणाचा शोध लागेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका तिच्या नातलगांनी घेतल्याने दुपारी तीनपर्यंत जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण होते. 

एकतर्फी प्रेमातून आत्महत्या 
काजल हिचे महाविद्यालयातीलच एका मुलावर एकतर्फी प्रेम होते. त्याच्याशी संपर्क ठेवण्यासाठी तिने तिच्याच वडिलांच्या मोबाईलवरूनही संदेश केल्याचे तपासात समोर आले. आजही तिने त्या मुलास मैत्रिणीच्या मोबाईलवरून संपर्क साधला होता. त्यानंतरच तिने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी त्या मुलाला शोधले. त्याच्या चौकशीतून काजलचे एकतर्फी प्रेम होते. त्यामुळेच त्या नैराश्‍यातून तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: nashik news suicide student