स्वाइन फ्लूचा आणखी एक बळी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

नाशिक - जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाचा गेल्या शनिवारी मृत्यू झाला. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यास स्वाइन फ्लूची लागण झाली होती. सध्या स्वाइन फ्लू विशेष कक्षात दोन रुग्ण दाखल असून, एकाचा अहवाल नकारात्मक आहे. दुसऱ्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. 

कैलास गणपत टाकळकर (36, रा. पिंपळगाव बसवंत, निफाड) असे स्वाइन फ्लूने दगावलेल्या रुग्णाचे नाव आहे. टाकळकर यांना 10 जुलैला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारदरम्यान गेल्या शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यांचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आत्तापर्यंत जिल्ह्यात सहा महिन्यांत 36 जण स्वाइन फ्लूने बळी ठरले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे 168 रुग्ण आढळले आहेत. सिन्नर, कळवण, दिंडोरी, निफाड, चांदवडसह नाशिक शहर परिसरातून स्वाइन फ्लूचे रुग्ण आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात आढळून आले. आत्तापर्यंत एक हजार 421 रुग्णांना टॅमिफ्लूच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू विशेष कक्षात दोन रुग्ण दाखल आहेत. यापैकी एका रुग्णाचा अहवाल नकारात्मक आला आहे. दुसऱ्या रुग्णांचा प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, असे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 

Web Title: nashik news swine flu