ऐन सणासुदीत उत्तर महाराष्ट्र स्वाइन फ्लूच्या विळख्यात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

नाशिक - ऐन सणासुदीच्या काळात उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहरे स्वाईन फ्लूच्या विळख्यात सापडली आहे. आतापर्यंत 60 मृत्यू झालेल्या या विभागात सध्या 331 जण उपचार घेताहेत. गणेशोत्सवाच्या धामधुमीत संततधारेमुळे पावसाळी आजारांचे प्रमाण वाढते आहे. तरीही आरोग्य विभाग मात्र सुस्त आहे. 

नाशिक - ऐन सणासुदीच्या काळात उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहरे स्वाईन फ्लूच्या विळख्यात सापडली आहे. आतापर्यंत 60 मृत्यू झालेल्या या विभागात सध्या 331 जण उपचार घेताहेत. गणेशोत्सवाच्या धामधुमीत संततधारेमुळे पावसाळी आजारांचे प्रमाण वाढते आहे. तरीही आरोग्य विभाग मात्र सुस्त आहे. 

स्वाइन फ्लूचा उत्तर महाराष्ट्रात प्रादुर्भाव वाढला आहे. झपाट्याने फैलाव होत असलेल्या स्वाइन फ्लू व स्वाइन फ्लूसदृश रुग्णांची संख्या वाढत आहे. शेकडोच्या संख्येत रुग्ण सरकारी व खासगी रुग्णालयांत दाखल होत आहेत. दाखल झालेल्या रुग्णांच्या अहवालानंतर पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही मोठे आहे. मात्र, त्याबाबत वैद्यकीय प्रतिबंधात्मक उपायांची मात्र वानवाच आहे. गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी गर्दी व मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर येत असताना स्वाइन फ्लूचा फैलाव रोखण्याचे उपाय वाढविण्याची गरज आहे. त्याविषयी कुठल्याही उपाययोजना दिसत नाहीत. 

कचरा अन्‌ संततधारेने प्रश्‍न गंभीर 
स्वाइन फ्लूसोबत दूषित पाणीपुरवठा, साठलेल्या कचऱ्यावर संततधार यामुळे आरोग्याचा विषय गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या प्रादुर्भावाशिवाय इतर आजारांचे प्रश्‍नही "आ' वासून उभे आहेत. सण-उत्सव काळातील कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लागलेला नाही. संततधारेमुळे जिल्ह्यातील डझनभर धरणांतून विसर्ग सुरू असून, पुरामुळे सर्व नद्यांचे पाणी दूषित आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर पावसामुळे 

साथरोगांना आमंत्रण देणारी स्थिती आहे. स्वच्छ महाराष्ट्र उपक्रमातील शौचालयमुक्त झालेल्या गाव, पालिका आणि अगदी नाशिक महापालिकेसारख्या मोठ्या महापालिका क्षेत्रात उघड्या शौचालयांचा प्रश्‍न सुटलेला नाही. 

स्वाइन फ्लूची स्थिती 

जिल्हा पॉझिटिव्ह रुग्ण मृत्यू 
-------------------------------------- 
नाशिक 276 46 
नगर 36 11 
धुळे 13 02 
जळगाव 06 01 

Web Title: nashik news swine flu