भुजबळ समर्थकांच्या तालुकावार बैठका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

नाशिक - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर सरकारकडून सूडबुद्धीने होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ राज्यात एकाच वेळी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय व तालुकास्तरावर तहसील कार्यालयासमोर मंगळवारी (ता.2) सकाळी 11 वाजता निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनाच्या नियोजनासाठी भुजबळ समर्थक समन्वय समितीकडून जिल्ह्यामध्ये तालुकावार बैठका घेण्यात येत आहेत. समन्वय समितीची मुख्य बैठक आज नाशिकमध्ये झाली. बैठकीत 2 जानेवारीच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. या आंदोलनात सहभागासाठी शहर व जिल्ह्यातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविल्याची माहिती समन्वय समितीकडून देण्यात आली आहे.
Web Title: nashik news Taluka meetings of Bhujbal supporters