किमान तापमानातील वाढीने थंडी गायब

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

नाशिक - गेल्या आठवडाभरामध्ये किमान तापमानात वाढ होत गेल्याने थंडीच गायब झाली आहे. नाशिकच्या किमान तापमानाचा पारा 14.3 अंश सेल्सिअस नोंदला गेला असून, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. आठवडाभरात किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीच नाहीशी झाली आहे.

आठवडाभरापूर्वी नाशिकसह जिल्ह्यात कडाक्‍याची थंडी होती. निफाडमध्ये किमान पारा सात अंशांपर्यंत, तर नाशिकमध्ये पारा आठ अंशांपर्यंत खाली घसरला होता. सोमवारी (ता. 8) नाशिकचे किमान तापमान 8.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले. परंतु त्यानंतर तापमानात सातत्याने वाढ होत पारा 15.8 अंश सेल्सिअसपर्यंत पोचला. त्यामुळे गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातून थंडीच गायब झाली आहे. शुक्रवारी (ता. 12) रात्री नाशिकचा किमान पारा 12.8, तर शनिवारी (ता. 13) रात्री 15.8 अंश सेल्सिअस नोंदला गेला. आणखी दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील किमान तापमानाची नोंद गोंदियात 9.7 अंश सेल्सिअस नोंदली गेली. उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली. त्यामुळे राज्यातून थंडीच गायब झाल्याचे चित्र आहे.

किमान तापमान
8 जानेवारी - 8.5
9 जानेवारी - 10.3
10 जानेवारी - 11
11 जानेवारी - 11.6
12 जानेवारी - 12.8
13 जानेवारी - 15.8
14 जानेवारी - 14.3

Web Title: nashik news temperature increase