गावाला जाताय... सावधान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

नाशिक - पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत काही दिवसांमध्ये चोऱ्या-घरफोड्या-वाहनचोरीमध्ये वाढ झाली आहे. त्यातच दिवाळीच्या सुट्या असल्याने लक्ष्मीपूजनानंतर बहुतांश नागरिक चार- आठ दिवसांसाठी आपापल्या गावी जातात. त्यामुळे गावी जाणाऱ्यांनीच आपल्या घरातील मौल्यवान वस्तूंच्या वा वाहनांच्या सुरक्षिततेची उपाययोजना करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. सुट्यांच्या पार्शवभूमीवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गस्तीपथके वाढविण्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात नेहमीप्रमाणे गस्तीपथक नावालाच असल्याचे एव्हाना सिद्धही झाले आहे. 

दिवाळीनिमित्त शाळांसह औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनाही आठवडाभराच्या सुट्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रात यापेक्षा अधिक दिवसांच्या सुट्या आहेत. बहुतांश नागरिक लक्ष्मीपूजनानंतर आपापल्या गावी जातात. घरांना कुलूप असणार आहे. काही दिवसांपासून शहरात चोऱ्या-घरफोड्यांसह चारचाकी-दुचाकी वाहन चोऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. महागड्या चारचाकी गाड्या व दुचाक्‍या सध्या चोरट्यांच्या रडारवर आहे. बंद घर-फ्लॅट दिसताच ते फोडण्याचे प्रकार भरदिवसा होऊ लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गस्ती पथकांची संख्या वाढवून सातत्याने गस्त घातली जाईल, असे सांगितले असले तरी स्थानिक पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांकडून मात्र भलतीच माहिती दिली जात आहे. नागरिकांनी आपल्या घराच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वत:च घ्यायची, असे सांगितले जात आहे. अर्थात, घरात मौल्यवान वस्तू ठेवू नये इथपर्यंत ठीक आहे; परंतु संपूर्ण घराचीच सुरक्षितता स्वत: घ्यायची असेल तर पोलिस कशासाठी, असा प्रतिसवाल नागरिकांकडून केला जात आहे. त्यातही गस्ती पथकात वाढ करण्याचे सांगितले जात असले तरी हे पथक कागदावरच राहतात, अशी टीका नागरिकांनी केली.

दिवाळी सुटीच्या पार्श्‍वभूमीवर गस्तीपथक वाढविले आहे. नागरिकांनीही मौल्यवान वस्तू घरात ठेवू नये. जाताना आपल्या शेजाऱ्यांना आणि पोलिस ठाण्याला अवगत करून जावे. 
- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

Web Title: nashik news theft