दुचाकीचोरी प्रकरणी दोन मुलींना अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

नाशिक - शहरातून दुचाकीचोरीच्या घटना सातत्याने घडत असताना, यात अल्पवयीन चोरट्यांपासून ते सराईत गुन्हेगारच सापडलेले आहेत. आता मुलीही दुचाकी चोरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेल्या दोन मुलींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांनी मोपेडचोरीची कबुलीही दिली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. 

गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पथक जिल्हा रुग्णालय, ठक्कर बझार परिसरात गस्तीवर होते. त्या वेळी पोलिस उपनिरीक्षक शेख जाकिर हुसेन यांनी जिल्हा रुग्णालय परिसरात विनाक्रमांकाची मॅस्ट्रो मोपेड अडविली. संशयित चालक कुणाल माळीकडे चौकशी केली असता ही दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. मोपेडला क्रमांक नसल्याने चेसीज व इंजिन क्रमांकावरून शोध घेतला असता या प्रकरणी गंगापूर पोलिसांत 10 ऑगस्टला गुन्हा दाखल होता. संशयित कुणाल माळीकडे चौकशी केली असता त्याने आरवायके महाविद्यालयातील दोन मुलींनी दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. 

त्यानुसार, युनिट एकच्या पथकाने संशयित उमा सोनवणे (वय 20, रा. भोळे मंगल कार्यालयामागे, अंबड-लिंक रोड, सिडको), चित्रांगना बागूल (20, रा. पार्वती बंगला, वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ, हेडगेवारनगर, सिडको) या दोघींना ताब्यात घेतले. संशयित दोघींनी 40 हजार रुपयांची मोपेड आरवायके महाविद्यालयाच्या वाहनतळावरून चोरल्याची कबुली दिली. 

Web Title: nashik news theft girl

टॅग्स