नाशिक : एकाच कुटुंबातील तिघांचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

या खूनाची माहिती गावात समजताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली असून, पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वणी पोलिस व नाशिक ग्रामीण पोलिसांकडून तपासकार्य सुरू आहे.

नाशिक - दिंडोरी तालुक्यातील कोकणगाव येथे मंगळवारी मध्यरात्री एकाच कुटुंबातील तिघांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोकणगाव येथे मध्यरात्री एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलाचा खून करण्यात आला आहे. जगन मुरलीधर शेळके, शोभा जगन शेळके व हर्षद जगन शेळके अशी खून झालेल्यांची नावे आहेत. खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.

या खूनाची माहिती गावात समजताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली असून, पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वणी पोलिस व नाशिक ग्रामीण पोलिसांकडून तपासकार्य सुरू आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
मॉन्सून 8 जूनला मुंबईत: हवामान विभाग​
लोकांनी काय खावे हे सरकार ठरवत नाही: केंद्रीय मंत्री
बीफ फेस्टिव्हलवरून विद्यार्थ्याला मारहाण​
मुख्यमंत्र्यांचा शेट्टी, जयंतरावांवर नेम; सदाभाऊंची ढाल​
दिल्ली आयआयटीतील विद्यार्थीनीची आत्महत्या

जनावरे विक्री बंदीबाबत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सूट शक्‍य
शेतकरी संपावर काहीही साध्य होणार नाही : माधव भंडारी
दीड पायाच्या ‘लक्ष्मी’ची झेप
#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान
शहरांच्या जागतिक क्रमवारीत पुणे तेरावे

Web Title: Nashik news Three murderers of a family in dindori