आदिवासी संघटनेचे सोमवारी "उलगुलांन'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

नाशिक - अर्धे शैक्षणिक वर्ष संपूनही शासकीय वसतिगृहासाठी विद्यार्थ्यांचे रखडलेले प्रवेश, मुलींच्या वसतिगृहासाठी सुरक्षा व्यवस्था, आरोग्य, स्वच्छता, स्कॉलरशीप अशा विविध प्रलंबित समस्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने येत्या सोमवारी (ता. 9) आदिवासी आयुक्तालयावर "उलगुलांन' (आंदोलन) करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन पाच महिने उलटूनही अनेक विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेले नाहीत. मुलींच्या शासकीय वसतिगृहासंदर्भातील प्रश्‍न सोडवावेत, पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने ती योजना बंद करावी, वसतिगृह प्रवेश व शिष्यवृत्तीची ऑनलाइन प्रक्रिया, डीबीटी योजनादेखील बंद करण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी आंदोलन होणार आहे.
Web Title: nashik news tribal organisation agitation