वसईच्या मासेविक्रेत्याला नाशिकमध्ये लुटले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

नाशिक - सातपूर येथील पपया नर्सरीजवळ संशयितांनी वसईच्या (मुंबई) मासे विक्रेत्यास फोन करीत बोलावून घेतले आणि त्यास जबर मारहाण करीत खिशातील 15 हजार रुपये बळजबरीने लुटून नेल्याची घटना घडली आहे. शहाजन मनियान काटू टाडाटिल जॉन (रा. जे रेसिडेन्सी, एवा स्टाइन सिटी, वसई (पूर्व), मुंबई) यांच्या तक्रारीवरून सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी सचिन रमेश धोत्रे (30, रा. महाराष्ट्र कॉलनी, आंबेडकर मार्केट, सातपूर) यास मोबाईल क्रमांकावरून अटक केली असून, त्याच्या तीन साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.
Web Title: nashik news vasai fisher loot crime