नाशिकमध्ये १९ वर्षांत धावणार दुप्पट वाहने

विक्रांत मते 
शुक्रवार, 9 जून 2017

नाशिक - देशात वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या नाशिकमध्ये पुढील १९ वर्षांत म्हणजेच २०३६ पर्यंत एका तासाला अकरा हजार वाहने रस्त्यावर धावणार आहेत. अर्बन मास ट्रान्झिस्ट संस्थेने महापालिकेला सादर केलेल्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. 

नाशिक - देशात वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या नाशिकमध्ये पुढील १९ वर्षांत म्हणजेच २०३६ पर्यंत एका तासाला अकरा हजार वाहने रस्त्यावर धावणार आहेत. अर्बन मास ट्रान्झिस्ट संस्थेने महापालिकेला सादर केलेल्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. 

सध्या शहरात प्रतितास पाच हजारांहून अधिक वाहने ये-जा करतात. मुंबई-आग्रा महामार्ग, नाशिक-पुणे रोड, शहराच्या मध्यवस्तीतील शिवाजी रोड व टिळक रोड, नाशिक-मुंबई महामार्गावर सर्वाधिक वर्दळ आहे. सीबीएस, मोडक पॉइंट, दत्त मंदिर चौक, विजय-ममता सिग्नल व सिटी सेंटर मॉल जंक्‍शनवर सर्वाधिक वाहनांची वर्दळ निर्माण झाल्याचे अहवाल सांगतो. शहरातील वाहतुकीचा सर्वंकष आराखडा तयार करण्याचे काम दिल्लीच्या अर्बन मास ट्रान्झिस्ट संस्थेला देण्यात आले. संस्थेने नुकताच महापालिकेला आराखडा सादर केला. त्यातून वाहतुकीसंदर्भातील त्रुटी समोर आल्या आहेत.

अहवालानुसार २०३६ पर्यंत शहरात प्रतितास वाहनांची घनता दुपट्टीपेक्षा अधिक होणार असल्याचे नमूद केले असून, गेल्या वर्षापर्यंत शहरात सात लाख ३२ हजार वाहनांची नोंद झाली.

सीबीएस, मोडक पॉइंटवर अधिक वाहने
सर्वेक्षणात सर्वाधिक वर्दळ असलेल्या स्थळांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात सीबीएस चौकात एका तासात सात हजार २९२ वाहने ये-जा करतात. मोडक पॉइंट येथे सहा हजार ८४१, नाशिक रोडच्या दत्तमंदिर चौकात सहा हजार ५७०, विजय-ममता सिग्नल येथे सहा हजार १२९, सिटी सेंटर मॉल चौकात पाच हजार ७८५ वाहने एका तासात ये-जा करतात. त्यापाठोपाठ आयटीआय सिग्नल (५,७१०), लेखानगर चौक (५,६९१), डीजीपीनगर (५,६५९), द्वारका चौक (५,३६०), काठे गल्ली (५,१७३), मायको सर्कल (४,९७४), निमाणी (४,८८९), पेठ नाका (४,८६५), खडकाळी चौक (४,८६२), गडकरी चौक (४,७७१), थत्तेनगर (४,७२४), जुना गंगापूर नाका (४,६७१), जेहान सर्कल (३,४४९), तर सारडा सर्कल (३,६५२) येथे वाहनांची सर्वाधिक घनता मोजण्यात आली.

Web Title: nashik news vehicle

फोटो गॅलरी