महाधिवक्ता कुंभकोणी यांचा राजीनामा घ्या - विखे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

नाशिक - न्यायव्यवस्थेवर तुमचा विश्‍वास नाय काय, असा प्रश्‍न उपस्थित करून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी न्या. अभय ओक यांच्यावर पक्षपातीपणाचा आक्षेप घेतला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गप्प का, अशी विचारणा शुक्रवारी केली. तसेच महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा घ्यावा अन्‌ जलमय मुंबईला कारणीभूत ठरलेले मुंबई महापालिका आयुक्तांवर जबाबदारी निश्‍चित करावी, अशा मागण्या विखे पाटील यांनी केल्या. 

सरकारी विश्रामगृहात विखे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, कॉंग्रेसच्या प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील, शहराध्यक्ष शरद आहेर उपस्थित होते. एका महिन्यात इमारत कोसळण्याची तिसरी घटना घडली. घाटकोपरच्या इमारतीच्या दुर्घटनेनंतर शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे गप्प बसले. पण भेंडीबाजारमध्ये "म्हाडा'ची इमारत आहे, असे सांगून ठाकरे मोकळे झाले, असे स्पष्ट करुन विखे-पाटील म्हणाले, की मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी पाच हजार टन कचरा काढला असे नमूद केले. मग कचरा न काढता ठेकेदारांना पैसे दिले गेले काय? याचे उत्तर मिळत नाही. 

मुख्यमंत्री शिवसेनेच्या दबावाखाली 
मुख्यमंत्री शिवसेनेच्या दबावाखाली आहेत, असा आरोप करुन विखे-पाटील म्हणाले, की नालेसफाईच्या कामांच्या "एसआयटी' चौकशीबद्दल मुख्यमंत्री बोलत नाहीत. नालेसफाईचा अहवाल विधिमंडळाच्या सभागृहात ठेवायला मुख्यमंत्री तयार नाहीत. याशिवाय मुख्यमंत्री स्वकियांवर किती अन्याय करणार हा खरा प्रश्‍न आहे. भ्रष्टाचाराची पाठराखण केली जात आहे याचे गाऱ्हाणे राज्यपालांकडे मांडले जाणार आहे. 

राणे नाराज आहेत अन्‌ नेते समजूत घालताहेत 
माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी कॉंग्रेसमध्ये राहावे, त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे, असे एकीकडे सांगत असताना विखे-पाटील यांनी "राणे हे नाराज आहेत आणि नेते त्यांची समजूत घालत आहेत,' असे स्पष्ट केले. तसेच कुणी कुणाच्या घरी गेल्याने कुणी पक्षात राहील असे नाही, असेही सांगायला ते विसरले नाहीत. तसेच पक्षाबद्दल जाहीरपणे बोलण्याऐवजी नाराजीबद्दल घरात बसून चर्चा व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

Web Title: nashik news vikhe patil