संपाच्या यशस्वितेसाठी एकवटली गावे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

नाशिक - येत्या 1 जूनपासूनचा शेतकरी संप यशस्वी करण्याचा निर्धार करीत जिल्ह्यातील शेतकरी आता एक होऊ लागले आहेत. किसान क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून मागील आठवड्यापासून संपासाठी वातावरणनिर्मितीचे काम केले जात आहे. त्यासाठी विविध भागात बैठका, सभांनी जोर धरला आहे.

जिल्हास्तरीय बैठकीत संपाचे नियोजन
नाशिक बाजार समितीत झालेल्या जिल्हास्तरीय विशेष बैठकीत 1 ते 10 जून या काळात होणारा संप यशस्वी करण्याबाबतची रणनीती ठरविण्यात आली. किसान क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी या बैठकीत भाग घेतला. गावस्तरावर नोंद ठेवून तालुकास्तरीय समन्वय समितीने करावयाच्या कृतीबाबत नियोजन करण्यात आले. या काळात दूध, भाजीपाला यांसह कोणताही शेतीमाल शेतकरी बाजारात आणणार नाहीत.

संपाच्या नियोजनासाठी आज गिरणारे परिसरातील दुगाव, वाडगाव, नाईकवाडी, मुंगसरा, मातोरी, यशवंतनगर, नागलवाडी, धोंडेगाव या गावांतील शेतकरी जमले. किसान क्रांती मोर्चाचे नाशिक तालुका समन्वयक अनिल थेटे यांनी या बैठकीचे संयोजन केले.

Web Title: nashik news village consolidate kisan kranti morcha