ग्रामीण मद्यविक्रेत्यांना लवकरच अटीतून मुभा?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 एप्रिल 2018

नाशिक - ग्रामीण भागातील मद्यविक्री दुकानांना लागू असलेल्या ५०० मीटरच्या अटीमध्ये लवकरच शिथिलता आणून दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. गृह विभागाकडून लवकरच या संदर्भात अध्यादेश जारी केला जाणार आहे. 

नाशिक - ग्रामीण भागातील मद्यविक्री दुकानांना लागू असलेल्या ५०० मीटरच्या अटीमध्ये लवकरच शिथिलता आणून दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. गृह विभागाकडून लवकरच या संदर्भात अध्यादेश जारी केला जाणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत ५०० मीटरच्या आत असलेली मद्यविक्रीची दुकाने, बिअर बार बंद करण्याचे आदेश दिले आणि त्याची १ एप्रिल २०१७ पासून अंमलबजावणी सुरू झाली. परिणामी, मद्यविक्री परवाने व विक्रीतून मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर परिणाम झाला. विक्रेत्यांनी शासनाकडे या संदर्भात दाद मागितली असता, महापालिका व पालिका क्षेत्रातील मद्यविक्रेते व परमिट बारला ५०० मीटरच्या अटीतून वगळले. 

गृहविभाग सकारात्मक
महापालिका- पालिकांच्या हद्दीतील मद्यविक्रेते व परमिट बारसाठी शिथिल करण्यात आलेल्या अटींच्या धर्तीवर ग्रामीण भागातील विक्रेत्यांनाही दिलासा मिळावा या संदर्भात शासनस्तरावर गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरू होत्या. त्यास गृह विभागाने सकारात्मकता दर्शविल्याने लवकरच ग्रामीण भागातील मद्यविक्री दुकाने व परमिट बारलाही ५०० मीटरच्या अटीतून वगळले जाणार आहे. त्यासाठीचा अध्यादेश लवकरच जारी केला जाणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

Web Title: nashik news Village wine seller Free from the terms