वासाकाची वाटचाल पुन्हा गत वैभवाकडे सुरु

वासाकाची वाटचाल पुन्हा गत वैभवाकडे सुरु

खामखेडा (नाशिक): विठेवाडी वसाका कारखान्याच्या गळीत हंगामाची सुरुवात होऊन महिन्याभराचा कालावधी लोटला आहे. आज पावेतो ४०ह मे टन उसाचे गाळप झाले आहे. कसमादेची प्रमुख अर्थवाहिनी असलेली ही संस्था रुळावर आल्याने कसमादे भागात एकूण २६५५ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाल्याने व अजूनही लागवड होत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व कामगारांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे ठरवलेले उद्दिष्ट साध्य होऊन वसाका कारखाण्याची गतवैभव प्राप्त करण्याकडे दमदार सुरुवात झाली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य समजला जाणाऱ्या वसाका कारखान्याची २०१० नंतर चाके मंदावली व सन २०१२ मध्ये १५८ कोटींचा कर्जाचा डोंगर उरावर घेऊन वसाकाची चाके कायमची थांबली. पस्तीस हजार शेतकऱ्यांच्या मालकीची ही संस्था तत्कालीन राज्यकर्त्यांनी खाजगीकरण करण्याचा माणस असतांना मात्र आ डॉ राहुल आहेर यांनी वडील स्व. डॉ. दौलतराव आहेर आजारी असतांना देखील सरकार दरबारी आपले वजन वापरून ८ जानेवारी २०१६ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कारखान्याची चाके पुन्हा चालू करून अल्पावधीतच एक लाख टनाचे गाळप करून सहकारात एक नव्या अध्यायाची सुरुवात केली.

दुर्दैवाने या दरम्यान डॉ. आहेरांचे निधन झाले. नंतर नोटबंदी व काही तांत्रिक अडचणींमुळे कारखाना पुन्हा माघील गळीत हंगामात बंदच राहिला. एक हंगाम सुरु झाल्यानंतरच्या अडचणी मुळे कारखाना सुरूच होणार नाही अशा परिस्थितीत मात्र डॉ. राहुल आहेर व जिल्हाबँकेचे संचालक केदा आहेर यांनी पुन्हा कारखाना चालू करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून मुख्यमंत्री व सहकारमंत्री यांना आपली भूमिका समजावून सांगितली. मुंबई जिल्हाबँकेचे कार्यक्षेत्र नसतांना देखील स्वतःची मालमत्ता तारण देऊन कारखाना चालू करण्यासाठी अर्थसहाय्य मिळवले.

आहेर द्वयीनी कसमादे परीसरातील २८१ गावांमध्ये व जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या बैठका घेऊन कारखान्याला ऊस पुरवठा करण्यासाठी भावनिक आवाहन केले. आज त्यांच्या प्रयत्नांना यश येतांना दिसत आहे. शहादा, तळोदा, शिरपूर, पिलखोड, मेहुणबारे, अमळनेर, विसरवाडी, चाळीसगाव, कन्नड आदि भागातून वासाकाला ऊस पुरवठा होत आहे. आज अखेरीस ४० हजार मे टन उसाचे गाळप होत साडेतीन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्याच्या दिशेने वासाकाची वाटचाल सुरु आहे.

वासाकाचा हा गळीत हंगाम करो या मरो या परिस्थितीत असल्याची जाणीव व वसाका पुन्हा नव्याने उभा रहावा यासाठी सभासद,उस उत्पादकांना शेतकरी, अधिकारी, लोकपर्तीनिधी, कामगारांना असल्याने सर्वच घटकांनी कंबर कसली आहे. आ. राहुल आहेर यांनी कारखाना सुरू करण्यासाठी आपल्या राजकीय शक्तीचा व अभ्यासपूर्ण पाठपुराव्याचा वापर करून मुख्यमंत्री, सहकारमंत्री यांना ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व सभासद यांचे हक्क अबाधित ठेऊन कारखाना चालू करण्यासाठी कृतीआराखडा सादर केला. त्यांचा प्रस्ताव साखर आयुक्त व शासनाने सर्वसंमतीने मान्य करून गाळपास मान्यता दिली.

चालू गळीत हंगामात इतर कारखान्याच्या बरोबरीने भाव देत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागील बाकी, कामगारांचे थकीत व चालू वेतन, ग्रॅज्युटी, ऊसतोड कामगारांचे मजुरीचे पैसे,कारखान्याचा देखभाल दुरुस्तीसाठी राखीव निधी यासाठी नियोजन करण्यात आले आहे.तसेच हवामान बदल व नैसर्गिक आपत्ती यामुळे कार्यक्षेत्रात उसाचे उत्पादन कमी होत असल्याने कारखान्याकडून चांगल्या प्रतीच्या उसाचे बेणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

वसाका सुरळीत चालू ठेवण्या करिता डॉ. राहुल आहेर, प्राधिकृत अधिकारी व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक केदा आहेर, धनंजय पवार, बाळासाहेब बच्छाव, रामदास देवरे, अभिमन पवार, सहाय्यक निबंधक संजय गीते,कार्यकारी अधिकारी बी. डी. देसले, कृषी अधिकारी, अभियंते, कामगार, उसतोडणी मुकादम, वाहतूक दार, व ऊस उत्पादक शेतकरी हे सर्वच एकदिलाने दिवसरात्र मेहनत घेतांना दिसून येत आहेत. या सर्वांच्या मेहनतीने व विश्वासाने भविष्यात कारखाना आपले वैभव पुन्हा प्राप्त करणार आहे. वसाका हा इतर आजारी सहकारी साखर कारखान्यांसाठी नक्कीच आशेचा किरण असणार आहे.

वसाका सुरु झाल्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा विश्वास देखील वाढला आहे. २६५५ क्षेत्रावर उसाची लागवड झाली असुन पुढील हंगामात खोडव्यासह साधारणता ८ ते १०  हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्तीचा उस गाळपास वसाका कारखान्यात दाखल होणार असल्याने वासाकाची वाटचाल पुन्हा गत वैभवाकडे सुरु झाल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com