मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

नाशिक - प्रशासकीय यंत्रणेला आगामी निवडणुकांचे वेध लागले आहेत. निवडणूक आयोगाने एप्रिलमध्ये याद्या अद्ययावत करण्यासह दिव्यांग मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. दिव्यांग व्यक्तींबाबतची अचूक व वास्तविक माहिती जमा करण्यासाठी समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, नेहरू युवा केंद्र, महिला व बालकल्याण विभागासह स्वयंसेवी संस्थाचे सहकार्य घेऊन दिव्यांग मतदारांचा जिल्हास्तरीय डेटाबेस तयार करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
Web Title: nashik news voting list