शहरवासीयांना दोन वेळा पाणी द्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

नाशिक - जुलै महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली आहे.  प्रमुख नद्यांसह उपनद्याही दुथडी भरून वाहू लागल्या तरी महापालिकेतील भाजपकडून एक वेळ पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांचा रोष वाढल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत दोन वेळा पाणीपुरवठ्याची मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे.     

नाशिक - जुलै महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली आहे.  प्रमुख नद्यांसह उपनद्याही दुथडी भरून वाहू लागल्या तरी महापालिकेतील भाजपकडून एक वेळ पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांचा रोष वाढल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत दोन वेळा पाणीपुरवठ्याची मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे.     

गंगापूर धरणातील पाणी वाचवून भविष्यात नाशिककरांना एवढ्याच पाण्याची गरज असल्याचे दर्शवून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा तर भाजपचा डाव नाही ना, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यंदा पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच जोरदार हजेरी लावली. जुलैमध्ये पावसाने सरासरी ओलांडली. गंगापूरसह दारणा धरण, गौतमी-गोदावरी, काश्‍यपी, आळंदी ही छोटी-मोठी धरणे तुडुंब झाल्याने त्यांच्यातून पाणी सोडण्यात आले. आतापर्यंत जायकवाडीसाठी चाळीस टीएमसी पाणी रवाना झाले आहे.  

पाणीपुरवठ्यावर सारेच आक्रमक
जुने नाशिक, सिडको भागात तीव्र पाणीटंचाई असून, महापौरांच्या पंचवटी भागात नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. जलपूजनावेळी शिवसेनेने दोन वेळा पाणीपुरवठ्याची मागणी केली होती. सिडकोतील नागरिक पावसाळ्यात टंचाईला सामोरे जात असल्याचा मुद्दा नगरसेवक श्‍याम साबळे यांनी मांडला. पूर्व व जेल रोड भागात घरांमध्ये पाणी साठवणक्षमता कमी असल्याने महिला सकाळपासूनच नळांवर गर्दी करतात. पुरेशा पाण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रावर अधिकाऱ्यांना घातल्याचे नगरसेवक प्रशांत दिवे यांनी सांगितले.

यांत्रिक झाडूला विरोध
महापालिकेने यापूर्वी खत प्रकल्प, वीटभट्टी, पाणवेली काढण्यासाठी रोबोट यंत्रे खरेदी केली आहेत. त्या यंत्रांची स्थिती काय आहे, याचा अनुभव असल्याने यांत्रिकी झाडू खरेदीला शिवसेनेचा विरोध असल्याचे श्री. बोरस्ते यांनी स्पष्ट केले.

नाशिककरांच्या सहनशीलतेचा फायदा सत्ताधारी भाजपकडून घेतला जात आहे. सध्या पुरवठा होणारे पाणी नाशिककरांना पुरेसे असून, त्यावर शिक्कामोर्तब करून गंगापूर धरणातील पाणी जायकवाडीला सोडण्याचा डाव यामागे असावा.
-अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते

Web Title: nashik news water